National Nutrition Week: वयाच्या चाळीशी नंतर बहुतेक महिला होऊ लागतात ॲनिमियाच्या शिकार, हे आहे मुख्य कारण
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Nutrition Week: वयाच्या चाळीशी नंतर बहुतेक महिला होऊ लागतात ॲनिमियाच्या शिकार, हे आहे मुख्य कारण

National Nutrition Week: वयाच्या चाळीशी नंतर बहुतेक महिला होऊ लागतात ॲनिमियाच्या शिकार, हे आहे मुख्य कारण

Published Sep 01, 2024 02:56 PM IST

Anemia in Women: अनेकदा वाढत्या वयाबरोबर महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील एक समस्या म्हणजे ॲनिमियाची समस्या. ॲनिमियाची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रभावी आहे. जाणून घ्या याचे कारण

national nutrition week - महिलांना ॲनिमिया होण्याचे कारण
national nutrition week - महिलांना ॲनिमिया होण्याचे कारण (unsplash)

Reasons of Iron Deficiency in Women: बऱ्याचदा वय वाढण्यासोबत स्त्रियांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. यातील एक सामान्य समस्या म्हणजे ॲनिमियाची समस्या. ॲनिमियाची समस्या पुरुषांपेक्षा महिलांना जास्त प्रभावित करते. स्त्रियांच्या खाण्यापिण्याच्या योग्य सवयी नसणे, मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे, गरोदरपणात वाढत्या गर्भाची लोहाची मागणी जास्त असणे, स्तनपान ही कारणे याला कारणीभूत ठरू शकतात. सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा हा जागतिक पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त महिलांना ॲनिमिया होण्याचे कारण आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घ्या.

ॲनिमिया म्हणजे काय

ॲनिमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या शरीरात पुरेसे लाल रक्तपेशी नसतात. लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे शरीरात ऑक्सिजनची ही कमतरता भासते. ज्यामुळे शरीरात नवीन रक्त व्यवस्थित तयार होत नाही. म्हणजेच लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यामुळे ॲनिमिया होतो. ग्लोबल न्यूट्रिशनच्या अहवालानुसार, भारतात सर्व वयोगटातील ५१ टक्के महिला गरोदरपणात ॲनिमियाने ग्रस्त असतात.

हिमोग्लोबिनचे किती आहे आवश्यक

हिमोग्लोबिनचे प्रमाण पुरुषांमध्ये किमान १५ ग्रॅम आणि स्त्रियांमध्ये १३.६ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम निश्चित केले जाते.

ॲनिमियाची कारणं

स्त्रियांमध्ये ॲनिमियाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची मासिक पाळी आणि गर्भधारणा हे आहे. याशिवाय लोहाची कमतरता, अनुवांशिक कारणे, रजोनिवृत्ती आणि हार्मोनल बदल हे देखील याला कारणीभूत आहेत.

ॲनिमियाची लक्षणं

- चक्कर येणे

- विनाकारण थकवा जाणवणे

- त्वचेचा पिवळसरपणा

- हात आणि पायाचे तळवे थंड होणे

- डोळ्यांखाली डार्क सर्कल

- शरीराचे तापमान कमी होणे

- छातीत दुखणे

- नेहमी डोकं दुखणे

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे उपाय

- १० ते १२ मनुका रात्रभर भिजवून सकाळी पाणी प्या आणि मनुका खा. हिमोग्लोबिन झपाट्याने वाढते.

- मेथी, पालक, सरसो, हरभऱ्याची हिरवी पानं अशा हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. तसेच दुधी भोपळा, ब्रोकोली, गाजर आणि बीटरूट खा.

- भाजलेले हरभरा म्हणजे फुटाणे गूळसोबत मिसळून खाल्ल्याने हिमोग्लोबिन झपाट्याने वाढते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner