National Lazy Day 2024: आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्थरावर दररोज विविध डे साजरे केले जातात. या प्रत्येक डेजचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. परंतु बहुतांशवेळा असे काही दिवस साजरे केले जातात, ज्याची आपल्याला कल्पनाच नसते. आजसुद्धा असाच एक दिवस साजरा केला जात आहे ज्याबद्दल वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज 'नॅशनल लेझी डे' साजरा केला जात आहे. अर्थातच आज 'राष्ट्रीय आळशी दिवस' आहे. अनेकदा आळशी असण्याला वाईट समजले जाते. घरापासून-ऑफिसपर्यंत सर्वत्रच अळशी असण्यावरून सतत बोल खावे लागतात. मात्र आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते वाचून तुमचा विश्वास बसने थोडंसं कठीण आहे. कारण काही रिपोर्ट्सनुसार आळशी असणेसुद्धा फायद्याचे असते. आळशीपणाचेसुद्धा काही फायदे आहेत. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
दरवर्षी १० ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय आळशी दिवस' साजरा केला जातो. परंतु या दिवसाचा इतिहास काय आहे? हा दिवस केव्हा आणि कसा साजरा केला जाऊ लागला? हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की ज्या लोकांनी या दिवसाची सुरुवात केली, ते खूप आळशी होते आणि म्हणूनच या दिवसाबद्दल कोणत्याही प्रकारचे दस्तावेज उपलब्ध नाहीत. असे मानले जाते की, २००० मध्ये, आळशी लोकांना एक दिवस समर्पित करण्यासाठी राष्ट्रीय आळशी दिवस साजरा केला जाऊ लागला. जेणेकरून ते आळशी असल्याने काम करू शकत नसल्याच्या अपराधाशिवाय आराम करू शकतील. शिवाय लोकांकडून त्यांचा अपमानही होणार नाही.
दैनंदिन कामात व्यग्र असलेल्यांना आयुष्यात काही शांततेचे क्षणही आवश्यक असतात, हे या लोकांना समजावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. ज्यामध्ये एखादी व्यक्ती काम करू शकत नसल्याच्या अपराधाशिवाय आळशी राहू शकते आणि आराम करू शकते. आराम हा प्रत्येक माणसाला अत्यंत गरजेचा आहे. ताणतणापासून दूर, काहीही चिंता न करता आळशी बसून राहणे कधीकधी आरोग्यासाठी चांगले असते.
-बर्नआउट ही अशी स्थिती आहे, जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या इतकी थकते की त्याला दुसरे काहीही करण्याची हिंमत नसते. परंतु अभ्यासानुसार, आळशी लोकांना या परिस्थितीचा कमी सामना करावा लागतो. कारण हे लोक स्वतःला आराम करण्याचे अनेक मार्ग शोधतात. त्यामुळे तणावापासून दूर राहतात.
-तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आळसदेखील तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. वास्तविक, जे लोक आळशीपणाच्या श्रेणीत येतात ते अधिक आरामशीरपणे काम करतात, ज्यामुळे त्यांना तणाव किंवा चिंतेचा सामना करावा लागत नाही. त्यांची मानसिक स्थिती उत्तम राहते.
-आळशी लोक मानसिकदृष्ट्या फारच आरामशीर असतात. त्यामुळे त्यांना झोपेची कोणतीही समस्या येत नाही. आळसामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि त्यांना झोप न येण्याची समस्या उद्भवत नाही.
-झोपेचा अभाव आणि तणावामुळे खाण्याची इच्छा तर नष्ट होतेच पण पचनक्रियेवरही वाईट परिणाम होतो. याउलट आळशी लोक पुरेशी झोप आणि तणावापासून दूर राहिल्यामुळे त्यांना या समस्यांचा सामना करावा लागत नाही.