National Knee Day: गुडघेदुखीवर ५ शक्तिशाली घरगुती उपाय, 'हे' तेल लावताच वेदना होतील दूर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Knee Day: गुडघेदुखीवर ५ शक्तिशाली घरगुती उपाय, 'हे' तेल लावताच वेदना होतील दूर

National Knee Day: गुडघेदुखीवर ५ शक्तिशाली घरगुती उपाय, 'हे' तेल लावताच वेदना होतील दूर

Published Oct 22, 2024 09:19 AM IST

knee pain oil: गुडघेदुखीला अजिबात हलक्यात घेऊ नये. अधूनमधून गुडघेदुखी होणे हे सामान्य आहे. परंतु जर तुम्हाला सतत गुडघेदुखी आणि तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

National Knee Day 2024
National Knee Day 2024 (freepik)

Knee pain home remedies:  गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. आता केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही याचा सामना करावा लागत आहे. व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता आणि वृद्धत्वामुळे स्नायू आणि ऊतींचे नुकसान झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. गुडघेदुखीला अजिबात हलक्यात घेऊ नये. अधूनमधून गुडघेदुखी होणे हे सामान्य आहे. परंतु जर तुम्हाला सतत गुडघेदुखी आणि तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुडघेदुखीवर घरगुती उपाय, व्यायाम आणि औषधांनी उपचार करता येतात.

मोहरीचे तेल-

गुडघेदुखी दूर करण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे. हे गुडघ्याच्या आसपासच्या नसांमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि स्नायू आणि सांध्यातील वेदना कमी करते. यासाठी मोहरीच्या तेलात एक चिरलेले लसूण टाकून गुडघ्यांना मसाज करा.

लिंबूचे रस-

गुडघेदुखीपासून आराम देण्यासाठी लिंबाचा रस प्रभावी उपाय म्हणून काम करतो. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड शरीरातील युरिक ऍसिड कमी करते जे संधिवात होण्याचे कारण आहे. लिंबूमध्ये अँटी इन्फ्लीमेंटरी गुणधर्म देखील असतात जे जळजळ, वेदना आणि गुडघेदुखीमध्ये येणारी सूज कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही लिंबाची साल (सुती कापडात गुंडाळून) गरम तिळाच्या तेलात भिजवून गुडघ्यावर ठेवू शकता.

आले-

स्नायू ताण किंवा सांधेदुखीमुळे गुडघेदुखीसाठी आले उत्तम आहे. आल्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंटरी, अल्सर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यासाठी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचे पाणी पिऊ शकता किंवा आल्याची पेस्ट बनवून प्रभावित भागावर लावू शकता.

हळद-

हळदीमध्ये अँटी इन्फ्लीमेंटरी गुणधर्म असतात. आणि हळदी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी हळद अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते. गरम दुधात हळद मिसळून तुम्ही याचे सेवन करू शकता. हळदीची पेस्ट प्रभावित भागावर देखील लावता येते.

एप्सम सॉल्ट-

एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फेटसारखे वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. विशेषतः मॅग्नेशियममुळे प्रभावित भागाची सूज कमी होते. यासाठी आंघोळीच्या पाण्यात एप्सम सॉल्ट म्हणजेच मीठ मिसळा. एप्सम मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने रक्त प्रवाह सुधारतो. याशिवाय तुम्ही तुमच्या पाण्यात पेपरमिंट तेल आणि लोबान तेल देखील घालू शकता.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner