Handloom Saree Caring Tips: हातमागाच्या साड्या परिधान केल्यानंतर लूक वेगळाच दिसतो. सण, लग् नसमारंभात काही महिलांना हातमागाच्या साड्या घालायला नेहमीच आवडतात. भारतातील हातमाग विणकरांना आदरांजली वाहण्यासाठी आणि देशातील समृद्ध हातमाग उद्योगाचे प्रदर्शन करण्यासाठी दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. या खास निमित्ताने आम्ही तुम्हाला हातमागाच्या साडीची काळजी कशी घ्यावी हे सांगत आहोत. खरं तर या साड्या खूपच नाजूक असतात. अशा वेळी त्यांची नीट काळजी घेतली नाही तर ते खराब होतात. अशा वेळी जाणून घ्या या साड्यांची काळजी कशी घ्यावी
हातमागच्या साड्यांची वेगळीच चमक असते. अशा वेळी ते घरी धुतले तर त्यांची चमक खराब होते. अशा साड्या घरी स्वत: धुण्यापेक्षा ड्राय क्लीन करून घ्या. या साड्या अतिशय नाजूक असतात, नीट धुतल्या नाहीत तर त्यांचा रंग, पोत आणि डिझाईन बिघडते. त्यामुळे या साड्या ड्राय क्लीन करून घेणे चांगले. ड्राय क्लीनमध्ये पाण्याचा वापर केला जात नाही, तरी यामुळे घाणेरडे डाग साफ होतात.
थेट सूर्यप्रकाशात किंवा उन्हात सिल्क किंवा जरीच्या साड्या वाळवण्याची चूक करू नका. उन्हाचे किरण आणि उष्णतेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने अशा साड्या खराब होऊ शकतात. कडक उन्हात कपडे वाळवण्यामुळे सुद्धा रंग फिकट होऊ शकतो. त्यामुळे त्यांना सावलीत वाळवणे चांगले असते.
हातमागाच्या साड्या व्यवस्थित साठवून ठेवणेही महत्त्वाचे आहे. त्या अशाच ठेवल्या तर साडी फार काळ नवीन राहणार नाही. त्यामुळे या साड्या नेहमी कॉटन कव्हरमध्ये ठेवा. यामुळे त्यांचा रंग, डिझाईन सर्व अबाधित राहते. त्याच बरोबर कव्हरमध्ये ठेवल्यास धूळ आणि ओलाव्यापासून साड्यांचे संरक्षण होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)