Girlfriend Day Wishes: आपल्या लेडी लव्हला पाठवा हे प्रेमळ संदेश, 'गर्लफ्रेंड डे' होईल आणखी खास!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Girlfriend Day Wishes: आपल्या लेडी लव्हला पाठवा हे प्रेमळ संदेश, 'गर्लफ्रेंड डे' होईल आणखी खास!

Girlfriend Day Wishes: आपल्या लेडी लव्हला पाठवा हे प्रेमळ संदेश, 'गर्लफ्रेंड डे' होईल आणखी खास!

Published Jul 31, 2024 04:27 PM IST

National Girlfriend Day 2024: १ ऑगस्ट हा दिवस गर्लफ्रेंडसाठी समर्पित आहे. नॅशनल गर्लफ्रेंड डेला तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला काही रोमँटिक मेसेज पाठवू शकता. येथे पाहा बेस्ट मेसेज

नॅशनल गर्लफ्रेंड डे
नॅशनल गर्लफ्रेंड डे (unsplash)

Happy Girlfriend Day Romantic Wishes and Messages: ऑगस्ट महिना मित्रांबरोबरच प्रेमी कपल्ससाठीही खूप खास असतो. या महिन्याची पहिली तारीख पूर्णपणे गर्लफ्रेंडसाठी समर्पित आहे. ज्या मुलांच्या गर्लफ्रेंड आहेत त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास असतो. अशा वेळी आपल्या लेडी लव्हसाठी हा दिवस खास बनवणं हे मुलांचं कर्तव्य बनतं. गर्लफ्रेंडला काही रोमँटिक मेसेज पाठवून तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. येथे काही रोमँटिक शुभेच्छा संदेश आहेत, जे तुम्ही गर्लफ्रेंडला पाठवू शकता.

 

गर्लफ्रेंडसाठी रोमँटिक मेसेज

तुझे माझे नाते असे असावे

जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे

कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी

मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे

Happy Girlfriend Day

 

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहे

भविष्याचे वेध तुला कवेत घेऊनच घ्यायचे आहेत

रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत

प्रिये, त्यासाठी फक्त तुझी साथ हवी आहे

Happy Girlfriend Day

माझ्या आयुष्यातील अंधार दूर करत

त्यात प्रकाश आणणारी व्यक्ती

फक्त तू आणि तूच आहेस

Happy Girlfriend Day

 

एकमेकांच्या दूर राहिल्यावरच कळून येतं की

आपण एकमेकांच्या किती जवळ आहोत

दूर राहून प्रेम अधिकच वाढतं...

Happy Girlfriend Day

 

गुलाबाच्या फुलाला

गुलाब कसं देऊ

तूच आहेस श्वास माझा

तुझ्याशिवाय कसं जगू

Happy Girlfriend Day

 

तू सोबत असताना

मला गरज कोणाची लागत नाही

तू फक्त सोबत राहा

मी दुसरं काही मागत नाही...

Happy Girlfriend Day

 

परी सारखी आहेस तू सुंदर

तुला मिळवून मी झालोय धन्य

प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी

हीच माझी इच्छा नेहमीची...

Happy Girlfriend Day

 

मला फक्त एवढंच हवंय

माझ्या हृदयाची धडधड

तुझ्या हृदयाशी जोडलेली राहावी

तुझ्यासोबत जाणारी प्रेमाची रात्र अशीच राहावी

Happy Girlfriend Day

आता मी तुझ्या इतकं प्रेमात पडलोय,

तुझ्याशिवाय क्षणभरही जगावंसं वाटत नाही

Happy Girlfriend Day

 

प्रेम केव्हा झालं आणि कधी झालं माहीत नाही

मला फक्त एवढंच माहीत आहे की,

ते तुझ्यासोबत झालं आणि तुझ्यासोबतच राहील

Happy Girlfriend Day

Whats_app_banner