मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Girl Child Day Wishes: या संदेशांसह आपल्या लाडक्या मुलीला द्या आजच्या खास दिनाच्या शुभेच्छा!

National Girl Child Day Wishes: या संदेशांसह आपल्या लाडक्या मुलीला द्या आजच्या खास दिनाच्या शुभेच्छा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 24, 2024 09:39 AM IST

Girl Child Day Wishes in Marathi : महिला आणि बाल विकास मंत्रालयाने २००८ पासून राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.

National Girl Child Day 2024
National Girl Child Day 2024 (freepik)

Girl Child Day: देशातील मुलींना सक्षम करण्यासाठी दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींचे हक्क, शिक्षण, आरोग्य आणि पोषण यासारख्या इतर मुद्द्यांची जागरूकता आणणे. या दिवसाची सुरुवात २४ जानेवारी २००८ साली झाली. मुख्य म्हणजे २४ जानेवारी १९६६ इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यंदा १६ वा राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील मुलींना संदेशांद्वारे आनंदी दिवसाच्या शुभेच्छा (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) द्या.

बघा शुभेच्छा संदेश

> मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.

राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

> ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

>भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणार्‍या

सर्व ‘कन्यांना’ राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

>जगण्याचा हक्क तीचा पण आहे,

फक्त तिला, तुमचं प्रेम हवे आहे.

बालिका दिनाच्या शुभेच्छा!

> मुलीला समजू नका भार

तिच आहे तुमच्या जीवानाचा आधार

राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

>आपल्या लहान मुलीला हसताना पाहण्यापेक्षा दुसरी चांगली भावना नाही.

 राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

>मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.

राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

(मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)

WhatsApp channel

विभाग