National French Fries Day: फ्रेंच फ्राइज डे बनवा आणखी खास, घरी ट्राय करा 'या' यूनिक रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National French Fries Day: फ्रेंच फ्राइज डे बनवा आणखी खास, घरी ट्राय करा 'या' यूनिक रेसिपी

National French Fries Day: फ्रेंच फ्राइज डे बनवा आणखी खास, घरी ट्राय करा 'या' यूनिक रेसिपी

Published Jul 13, 2024 10:10 AM IST

National French Fries Day 2024: चिली चीज फ्राईजपासून ते स्वादिष्ट गाजर फ्राईजपर्यंत, या टेस्टी आणि यूनिक रेसिपींसोबत नॅशनल फ्रेंच फ्राइज डे साजरा करा.

नॅशनल फ्रेंच फ्राइज डे - यूनिक रेसिपी
नॅशनल फ्रेंच फ्राइज डे - यूनिक रेसिपी (Unsplash)

Homemade Unique Fries Recipe: प्रत्येकाची आवडती क्रिस्पी आणि टेस्टी ट्रीट साजरी करण्यासाठी तयार व्हा, कारण आज नॅशनल फ्रेंच फ्राइज डे आहे! दरवर्षी जुलै महिन्यात साजरा केला जातो. हे स्नॅक्स जगभरात सर्वात आवडते आणि सार्वत्रिकपणे एन्जॉय केले जाते. या आनंदाच्या प्रसंगी नेहमीचे फ्रेंच फ्राइज बाजूला ठेवून यावेळी काही यूनिक रेसिपी ट्राय करा. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज तुम्ही नेहमीच खात असाल. पण तुम्हाला काही नवीन ट्राय करायचे असेल तर नेहमीच्या फ्रेंच फ्राइजला ट्विस्ट देऊन या वेगळ्या पद्धतीच्या फ्राइज बनवा. या काही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय केल्या पाहिजे. क्रिएटिव्ह होममेड फ्रेंच फ्राय रेसिपीज शेफ राजी यांनी एचटी लाइफस्टाइलसह शेअर केल्या आहेत. हे तुमचा दिवस आणखी खास बनवतील.

 

चिली चीज फ्राईज

चिली चीज फ्राइज
चिली चीज फ्राइज (Unsplash)

साहित्य

- २ बटाटे

- १ कप लाल तिखट

- १/४ कप बारीक चिरलेले चेडर चीज

- १/४ वाटी जलपेनो

- बारीक चिरलेली कोथिंबीर

विधी

सर्वप्रथम ओव्हन ४५० डिग्री F (२३० डिग्री सेल्सियस) वर गरम करा. ऑलिव्ह ऑईल, मीठ आणि मिरपूड घालून फ्राइज टॉस करा. बेकिंग शीटवर पसरून २०-२५ मिनिटे किंवा सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत बेक करा. याता फ्राइज वर मिरची, चीज, जलपेनोस आणि आंबट क्रीम टाका. अतिरिक्त ५ मिनिटे किंवा चीज वितळून बबली होईपर्यंत बेक करा. चिरलेल्या कोथिंबीरने सजवा.

कोथिंबीर-लिंबू डिपसोबत गाजर फ्राईज

कोथिंबीर-लिंबू डिपसोबत गाजर फ्राईज
कोथिंबीर-लिंबू डिपसोबत गाजर फ्राईज (Pinterest)

साहित्य 

- २ मोठे गाजर सोलून फ्राय केलेले

- १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल

- १ टीस्पून स्मोक्ड पेप्रीका

- १/२ टीस्पून मीठ

- १/४ टीस्पून काळी मिरी

- १/४ कप चिरलेली कोथिंबीर

- १ टीस्पून लिंबाचा रस,

- १/४ टीस्पून लसूण पावडर

विधी

ओव्हन ४२५ डिग्री F (२२० डिग्री सेल्सियस) वर प्री-हीट करा. ऑलिव्ह ऑईल, स्मोक्ड पेप्रिका, मीठ आणि मिरपूड घालून गाजर टॉस करा. बेकिंग शीटवर गाजर पसरवून २०-२५ मिनिटे किंवा सोनेरी तपकिरी आणि क्रिस्पी होईपर्यंत बेक करा. एका छोट्या बाऊलमध्ये कोथिंबीर, लिंबाचा रस आणि लसूण पावडर एकत्र करा. गाजर फ्राईज कोथिंबीर-लिंबू डीपसोबत सर्व्ह करा.

थाई करी फ्राईज

साहित्य

- २ बटाटे

- १ चमचा थाई करी पावडर (लाल किंवा हिरवा)

- १ चमचा लिंबाचा रस

- १/४ वाटी चिरलेली ताजी कोथिंबीर

विधी

बटाटे फ्राईजप्रमाणे कापून घ्या. थंड पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा. गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. थाई करी पावडर, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून फ्राइज टॉस करा. लगेच सर्व्ह करा.

Whats_app_banner