Carrot Cake Donut Recipe: जून महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी नॅशनल डोनट डे साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस ७ जून रोजी साजरा केला जात आहे. लहान मुले असो वा मोठे, सर्वांनाच डोनट खायला आवडतात. बाजारात विविध प्रकारचे डोनट मिळतात. तसेच ते घरी बनवणे सुद्धा सोपे आहे. तुम्हाला सुद्धा घरी डोनट बनवायचे असे तर कॅरट केक डोनटची रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी केवळ टेस्टीच नाही तर ग्लूटेन फ्री, डेअरी फ्री, रिफाइंड शुगर फ्री असून, हेल्दी ट्रीट आहे. गाजर डोळ्यांसाठी फायदेशीर असून ते डोळे निरोगी ठेवतात, उन्हापासून त्यांचे संरक्षण करतात, मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या इतर समस्यांची शक्यता कमी करतात. बीटा कॅरोटीन, फायबर, व्हिटॅमिन के १, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससह अत्यंत पौष्टिक असण्यासोबतच गाजर वजन कमी करण्यास अनुकूल आहे आणि कोलेस्ट्रॉलच्या कमी पातळीशी देखील जोडलेले आहे. म्हणजेच ही रेसिपी फक्त टेस्टी नाही तर हेल्दी देखील आहे. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे कॅरट केक डोनट
- २ जास्त पिकलेली केळी
- १/३ कप वितळलेले नारळ तेल
- १/४ कप मॅपल सिरप
- २ अंडी
- १ टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
- २ टेबलस्पून नट बटर
- १ १/२ कप बदाम पावडर
- १/२ टीस्पून बेकिंग सोडा
- १ टीस्पून दालचिनी
- १ टीस्पून जायफळ
- चिमूटभर आले
- १/२ कप किसलेले गाजर
- १/४ कप गोल्डन मनुका
- फूल फॅट कॅन्ड कोकोनट मिल्क
- २ टेबलस्पून मॅपल सिरप
- १ टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
सर्वप्रथम ओव्हन ३५०° गरम करा आणि डोनट पॅन स्प्रे करा. हँड मिक्सर किंवा ब्लेंडरचा वापर करून २ जास्त पिकलेली केळी, १/३ कप वितळलेले खोबरेल तेल, १/४ कप मॅपल सिरप, २ अंडी, १ टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट मिक्स करा. आता त्यात २ टेबलस्पून नट बटर, १ १/२ कप बदामाचे पीठ, १/२ टीस्पून बेकिंग सोडा, १ टीस्पून दालचिनी, १ टीस्पून जायफळ, चिमूटभर आले, १/२ कप किसलेले गाजर टाका आणि ब्लेंड करा. नंतर हे १/४ कप गोल्डन मनुका मध्ये फोल्ड करा. नंतर साधारण २५ ते ३० मिनिटे बेक करा. चेक करण्यासाठी त्यात टूथपिक टाकून पाहा. आता फ्रॉस्टिंग करण्यापूर्वी ते नीट थंड होऊ द्या.
फूल फॅट कॅन्ड कोकोनट मिल्क रात्रभर थंड करा, जाड भाग काढा, पाणी राहू द्या. २ टेबलस्पून मॅपल सिरप आणि १ टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घाला. आपल्या हँड मिक्सर किंवा ब्लेंडरने व्हिप करा. तुम्ही डोनट होलला फ्रॉस्ट करू शकता. नंतर वर आणखी काही गाजर किसून टाकू शकता. तुमचे कॅरट केक डोनट तयार आहे.