मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Doctor's Day Wishes: देवासारखे येती धावून... डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी पाहा उत्तम संदेश

National Doctor's Day Wishes: देवासारखे येती धावून... डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी पाहा उत्तम संदेश

Jul 01, 2024 09:56 AM IST

National Doctor's Day 2024: भारतात १ जुलै हा दिवस नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या डॉक्टर मित्राला किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांना शुभेच्छा देण्यासाठी हे मॅसेज पाठवू शकता.

डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा
डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा (freepik)

Happy Doctor's Day Wishes in Marathi: भारतात १ जुलै रोजी नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे डॉक्टरांना समर्पित आहे, जे प्रत्येक परिस्थितीत आपले कर्तव्य बजावताना रुग्णांवर उपचार करतात. हा दिवस भारतात पहिल्यांदा १९९१ साली साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. जर तुम्हाला तुमच्या डॉक्टर मित्राला किंवा फॅमिली डॉक्टरला या खास दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही या खास दिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. हे उत्तम मॅसेज तुम्ही डॉक्टरांना पाठवून त्यांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देऊ शकता.

हॅप्पी डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा

देवासारखे येती धावून

ट्रेंडिंग न्यूज

देवासारखे करतात काम...

माणसातल्या या देवाला

सदैव आमचा सलाम...

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

काळ वेळ न पाहता

जे होतात रुग्णसेवेत रुजू

सांगा डॉक्टर तुमचे उपकार

कोणत्या शब्दात मोजू

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

रुग्णसेवेचे ज्यांनी

अंखड व्रत हाती घेतले

असे डॉक्टरांच्या रुपातील

देव आम्हास भेटले

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आपल्यावर आलेले विघ्न हरणारे

चालते बोलते ईश्वर म्हणजे डॉक्टर

सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा

रुग्णांच्या हाकेला दिली ज्यांनी साद

ज्यांच्यासमोर उभं राहायची

रोगाची नाही बिशाद

अशा सर्व डॉक्टरांना

आज मनापासून धन्यवाद...

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

डॉक्टरांनी आपल्या आयुष्यात आरोग्याचा आनंद आणल्यानेच

हे जग राहण्यासाठी उत्तम व आरोग्यदायी स्थान बनले आहे

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या कर्तव्याची जाण ठेवून

रात्रंदिवस करतात रुग्णसेवा

अशा या कर्तव्यनिष्ठ डॉक्टरांचा

साऱ्या जगालाच वाटतो हेवा

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

रुग्णांना बरे करणे

हा एकच ध्यास

अशा डॉक्टरांसाठी सर्वांनी मिळून

आजचा दिवस करुया खास

डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

WhatsApp channel
विभाग