Symptoms of Dengue: डेंग्यू हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला हाडे तुटल्यासारखे तीव्र वेदना होतात. एका अहवालानुसार, दरवर्षी सुमारे ५-१० कोटी लोक डेंग्यू तापाने ग्रस्त असतात, त्यापैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. डेंग्यू हा सामान्य तापासारखाच दिसतो. परंतु वेळेवर उपचारांसाठी त्याची लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे.
हा ताप डेंग्यूच्या मादी एडिस एजिप्ती डासाच्या चाव्यामुळे होतो. हे डास सकाळी चावतात. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या महिन्यांत, जसे की जुलै ते ऑक्टोबर या काळात डेंग्यू पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. माणसाला एकाच चाव्यानेही संसर्ग होऊ शकतो. विशेष म्हणजे डासांना माणसांकडूनही डेंग्यू होऊ शकतो. जर मादी डासाने संक्रमित व्यक्तीला चावले तर त्या डासालाही डेंग्यूचा विषाणू होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर त्या मादी डासाने दुसऱ्या व्यक्तीला चावले तर डेंग्यूचा विषाणू त्याच्या शरीरातही प्रवेश करू शकतो. त्यानंतर सुमारे ३-५ दिवसांनी, व्यक्तीमध्ये डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात.
- थंडी वाजून अचानक ताप येणे
- स्नायू आणि सांध्यामध्ये वेदना
- अत्यंत अशक्तपणा
- कमी रक्तदाब
- भूक न लागणे
- मळमळ होणे
- उलट्या आणि चक्कर येणे
- ग्रंथीमध्ये सूज येणे
- तोंडात खराब चव येणे.
- घशात दुखणे
- चेहरा, मान आणि छातीवर पुरळ.
आरोग्य तज्ञांच्या मते, जर तुम्हाला कोणतीही गंभीर समस्या येत नसेल, तर घरीच उपचार करा. आजाराची तीव्रता समजून घेण्यासाठी, तुम्हाला या चाचण्या कराव्या लागतील. अँटीजेन ब्लड टेस्ट (NS1) आणि अँटीबॉडी टेस्ट (डेंग्यू सायलोलॉजी) द्वारे, तुम्हाला रोगाची तीव्रता आणि तुमच्या शरीराला किती प्लेटलेट्सची आवश्यकता आहे हे कळेल. चाचणी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि पाणी साचू देऊ नका. डासांना स्वतःपासून दूर ठेवा. स्वतःला झाकून ठेवा. जेणेकरून डास तुम्हाला चावू नयेत आणि शक्यतो झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. घरातील कोणत्याही रिकाम्या भांड्यात पाणी साचू देऊ नका. कारण डेंग्यूचे डास उघड्या पाण्यात प्रजनन करतात.
या आजारात योग्य आहार घेणे आवश्यक आहे. तुमच्या आहारात जास्त द्रवपदार्थ घ्या, कारण तापामुळे संपूर्ण शरीर डिहायड्रेट होते. अशा परिस्थितीत ताक, सूप, पातळ डाळ आणि बकरीचे दूध प्यावे. याशिवाय गिलॉय, डाळिंब, नारळ पाणी, पपईच्या पानांचा काढा आणि ब्रोकोलीचे सेवन करा. यामुळे प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या