Happy Daughters Day: जगभरातील लाडक्या मुलींना आदर आणि प्रेम देण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय कन्या दिना'ची सुरुवात झाली होती. सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी 'डॉटर्स डे' अर्थातच 'कन्या दिन' साजरा केला जातो. भारतात, हा दिवस आणखी खास आहे कारण आपण आपल्या लेकींना देवी मानतो. लेकीला बाबाची राजकुमारीदेखील म्हटले जाते. आज जगभरात कन्या दिन साजरा होत आहे. त्यामुळेच तुम्हीही तुमच्या मुलीला कन्या दिनाच्या शुभेच्छा देत, तिचा आजचा दिवस खास बनवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर हे सुंदर शुभेच्छा तुम्ही तिला पाठवू शकता.
''एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.''
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
''पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते,
अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते.
मुलींना जगवा, मुलींना वाचवा.''
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
''मुली नेहमीच स्पेशल असतात,
कारण त्यांच्याशिवाय घराला शोभा नाही. ''
हॅप्पी डॉटर्स डे!
''सुगंध, प्रेम आणि मुली, हे जिथले असतात तिथे थांबत नाहीत.
त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम करा
आणि त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या.''
जागतिक कन्या दिन शुभेच्छा!
''लेक हे असं खास फुल आहे
जे प्रत्येक बागेत फुलत नाही.
माझ्या बागेत फुललं
यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.''
जागतिक कन्या दिन शुभेच्छा!
''घरामध्ये जणू संगीत असतं प्रत्येक क्षणी,
जेव्हा मुली पैंजण घालून घरभर चालतात.
घरामध्ये प्रसन्नता ही मुलींमुळे असते,
कारण त्यांच्यामुळे घरांमध्ये असतो प्रकाश.
डॉटर्स डे च्या शुभेच्छा!
''उमलणाऱ्या कळ्या म्हणजे मुली,
आईबापांचं दुःख समजणाऱ्या मुली,
घराला देतात घरपण मुली,
मुलं आज असतील तर येणारं भविष्य आहेत मुली.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
''लेक असते ईश्वराचं देणं,
तिच्या पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं.''
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
''स्वागत तुझे मी असे करावे,
अचंबित हे सारे जग व्हावे,
तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे.''
हॅप्पी डॉटर्स डे!
''मुलीला हसताना पाहिलं,
तेव्हा मी विचारलं काय झालं.
तर म्हणाली बाबांनी मला आज त्यांचा मुलगा म्हटलं आहे.
हॅप्पी डॉटर्स डे!