Happy Cousins Day Wishes in Marathi: कझिन म्हणजेच चुलत भाऊ बहीण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतात. काही लोकांचे बेस्ट फ्रेंड हे त्यांचे कझिन असतात. वेगवेगळ्या शहरात, ठिकाणी राहत असले तरी मनाने ते एकाच ठिकाणी असतात. सुट्ट्यांमध्ये एकत्र घालवलेला वेळ, मस्ती याची नेहमीच आठवण काढली जाते. बालपणीच्या खोड्या मोठे झाल्यावरही कमी होत नाही. कितीही दूर राहत असलो तरी फोनच्या माध्यमातून नेहमी संपर्कात राहिले जाते. आपल्या चुलत भाऊ, बहीण यांच्या प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २४ जुलै रोजी कझिन्स डे साजरा केला जातो. तुम्ही सुद्धा आपल्या कझिनला खास दिवसाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी हे मॅसेज पाठवू शकता. हे संदेश तुमच्या नात्यातील प्रेम आणि आनंद आणखी वाढवतील.
नातं बहीण भावाचं
म्हणजे Tom And Jerry
तेवढाच राग आणि तेवढंच प्रेम
हे म्हणजे लय भारी
हॅपी कझिन डे
तोंडावर भांडत असलो ना
तरी मनात खूप प्रेम आहे
आईसारखी माया असलेले
ताई हे दुसरं रूप आहे
हॅपी कझिन डे
पवित्र नाते हे
बहीण भावाचे
लखलखत राहू दे
बंध जिव्हाळ्याचे
हॅपी कझिन डे
कधी भांडतो तर कधी रुसतो
तरीही न सांगता प्रत्येक गोष्ट समजून घेतो
हॅपी कझिन डे
कोणत्या नात्या नसेल
एवढी ओढ एकाच नात्यात आहे
म्हणून कझिनचं हे नातं
खूप गोड आहे
हॅपी कझिन डे
आपल्या आयुष्यात माणसं येतात आणि जातात
पण आपले बहीण भाऊ कायम आपल्यासोबत असतात
हॅपी कझिन डे
मी क्यूट आणि माझे कझिन्स सुपर क्यूट
बाकीचे सारे म्हणजे सेलमध्ये मिळालेली सूट...
हॅपी कझिन डे
हे सर्व समजून घेतात
माझ्या हृदयाची प्रत्येक नाडी पकडतात,
ते लहान आहेत पण,
तरीही माझ्या पाठीशी उभे आहेत.
हॅपी कझिन डे
एकत्र भांडतात
मग सेलिब्रेशन करतात,
असेच तर कझिन
एकमेकांना प्रेम व्यक्त करतात
हॅपी कझिन डे
त्यांचा माझ्यावर विश्वास आहे,
माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात,
म्हणायला तर ते लहान आहेत
पण मित्र म्हणून मला पाठिंबा देतात.
हॅपी कझिन डे
संबंधित बातम्या