मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Brother's Day Wishes: तुमच्या भावाला द्या ब्रदर्स डे च्या शुभेच्छा, पाठवा हे खास मॅसेज

Brother's Day Wishes: तुमच्या भावाला द्या ब्रदर्स डे च्या शुभेच्छा, पाठवा हे खास मॅसेज

May 22, 2024 11:21 PM IST

National Brother's Day 2024: दरवर्षी २४ मे रोजी नॅशनल ब्रदर्स डे साजरा केला जातो. या खास दिवशी तुमच्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही एखादा चांगला संदेश शोधत असाल, तर येथे खास शुभेच्छा पहा.

ब्रदर्स डे च्या शुभेच्छा मॅसेज
ब्रदर्स डे च्या शुभेच्छा मॅसेज (freepik)

Happy Brother's Day Wishes, Messages: भाऊ मोठा असो किंवा लहान, दोघांचे नाते असे असते की एकमेकांना साथ देणारे प्रेम, भांडण आणि मैत्री असते. तुमचे वय कितीही असले तरी तुमच्या आजूबाजूला भाऊ असेल तर तुम्ही तुमच्या सर्व चिंता विसरू शकता. आपल्या भावाबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २४ मे रोजी नॅशनल ब्रदर्स डे (national brothers day) साजरा केला जातो. अशा परिस्थितीत तुमच्या भावाला या खास दिवशी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत. हे मॅसेज भावाला पाठवून त्याला ब्रदर्स डे च्या शुभेच्छा द्या आणि आपले प्रेम व्यक्त करा.

ट्रेंडिंग न्यूज

ब्रदर्स डे च्या शुभेच्छा मॅसेज

आभाळाची साथ आहे

अंधाराची रात आहे

मी कोणाला घाबरत नाही

कारण माझ्या पाठीवर

माझ्या भावाचा हात आहे

Happy Brother's Day!

 

ज्याची सोबत असली की

मनात कसली भीती नसते

समस्यांना लढण्याची प्रेरणा मिळते

अशा माझ्या ग्रेट भावाला

Happy Brother's Day!

 

भाऊ बहिणीचं प्रेम पण वेगळंच असतं

एकमेकांसाठी जीव देतील

पण एक ग्लास पाणी देणार नाहीत

Happy Brother's Day!

तू माझ्यासाठी गुगल आहेस,

जिथं मला माझ्या आयुष्यातील

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं

तुझी साथ अशीच सर्वकाळ मिळो

हिच ईश्वर चरणी प्रार्थना

Happy Brother's Day!

 

भाऊ तर भांडखोरच असतात,

घरी बहिणीशी रिमोटसाठी भांडतात

आणि गरज पडली की तिच्यासाठी

जगाशीही भांडू शकतात

Happy Brother's Day!

 

कुठल्या नात्यात नसेल

एवढी ओढ आहे

म्हणूनच भाऊ बहिणीचं नातं

सर्वात गोड आहे...

Happy Brother's Day!

माझा भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे,

कोण म्हणतं माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही,

माझ्या भावासारखं प्रेम

माझ्यावर दुसरं कोणीच करत नाही....

Happy Brother's Day!

 

फक्त एक भाऊच असतो

जो वडिलांप्रमाणे प्रेम करू शकतो

आणि आईप्रमाणे काळजी घेऊ शकतो

Happy Brother's Day!

 

आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही

लाखो चेहरी दिसतात धरतीवर

पण माझ्या भावासारखा कोणी नाही

Happy Brother's Day!

भाऊ माझा आधार,

माझ्या ध्येयाचा किनार

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा सोबती

भाऊ माझ्या जीवनाचा सार

Happy Brother's Day!

WhatsApp channel
विभाग