National Boyfriend Day: आजच्या दिवशी बॉयफ्रेंडला पाठवा 'हे' रोमँटिक मेसेज, नाते होईल एकदम मजबूत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Boyfriend Day: आजच्या दिवशी बॉयफ्रेंडला पाठवा 'हे' रोमँटिक मेसेज, नाते होईल एकदम मजबूत

National Boyfriend Day: आजच्या दिवशी बॉयफ्रेंडला पाठवा 'हे' रोमँटिक मेसेज, नाते होईल एकदम मजबूत

Published Oct 03, 2024 09:52 AM IST

Boyfriend day wishes: अलीकडच्या काळात प्रेमाचे काही खास दिवसही वर्षभर साजरे केले जातात. ज्यामध्ये प्रेमी आपले प्रेम आणखी वाढवतात.

Boyfriend Day 2024
Boyfriend Day 2024 (pixabay)

Boyfriend day quotes: आपल्या आयुष्यात प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादी व्यक्ती या नात्यात येऊन आपले आयुष्य किती सुंदर बनवू शकते हे प्रेमात पडल्यावरच कळते. बॉलीवूड चित्रपट, कवींच्या कविता आणि गझलकारांच्या गझलांनी या प्रेमाचे अनोखे वर्णन केले आहे. असं की प्रेमासाठी कोणताही विशिष्ट दिवस नसतो, प्रेम वर्षाच्या ३६५ दिवसही बहरत आणि फुलत असतं. परंतु तरीही अलीकडच्या काळात प्रेमाचे काही खास दिवसही वर्षभर साजरे केले जातात. ज्यामध्ये प्रेमी आपले प्रेम आणखी वाढवतात. त्यामुळेच दरवर्षी 'राष्ट्रीय बॉयफ्रेंड दिवस' ३ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.आजच्या दिवशी आपल्या प्रियकर किंवा जोडीदाराला स्पेशल वागणूक आणि भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. शिवाय आपल्या बॉयफ्रेंडला सुंदर आणि रोमँटिक मेसेज पाठवून हा दिवस खास बनवला जाऊ शकतो. आम्ही तुमच्यासाठी एकापेक्षा एक रोमँटिक मेसेज घेऊन आलो आहोत.

 

  • 'बॉयफ्रेंड डे' साठी रोमँटिक मेसेज-

 

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर,

हात माझा धरशील ना?

सगळे खोटे ठरवतील तरी मला

तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

हॅप्पी बॉयफ्रेंड डे!

 

''माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,

काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,

फक्त हा देह माझा,

त्यातील जीव आहेस तू''

बॉयफ्रेंड डेच्या शुभेच्छा!

 

''कितीही भांडण झाली तरी,

तुझी माझी साथ कधी सुटत नाही,

आणि अनमोल हाच धागा कितीही

ताणला तरी तुटत नाही.''

हॅप्पी बॉयफ्रेंड डे!

 

'त्याने विचारले, मी तुझ्यासाठी काय आहे,

मी जवळ गेले आणि त्याला मिठीत घेतले,

आणि म्हणाले सर्वकाही''

बॉयफ्रेंड डेच्या शुभेच्छा!

 

''एक भाषा जी नजरेची नजरेलाच कळते,

शब्दाविना भावनांची मग,

नकळत देवा- घेवाण होते''

हॅप्पी बॉयफ्रेंड डे!

''गोड आठवणी आहेत तेथे

हळुवार भावना आहे,

हळुवार भावना आहेत तेथे

अतुट प्रेम आहे, जिथे अतूट प्रेम आहे

तेथे नक्कीच तू आहेस''

बॉयफ्रेंड डेच्या शुभेच्छा!

 

''जसे फुलातून सुगंध,

आणि सूर्यातून प्रकाश,

येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासात

तुझाच ध्यास''

हॅप्पी बॉयफ्रेंड डे!

 

''तुझी आठवण येणार नाही,

असे कधी होणार नाही,

काऱण तुझी आठवण आल्यावाचून राहणार नाही''

बॉयफ्रेंड डेच्या शुभेच्छा!

 

''एखाद्या व्यक्तिवर काही काळ प्रेम करणे

हे आकर्षण असतं,

एकाच व्यक्तिवर मरेपर्यंत ते प्रेम राहणं

हे खरं प्रेम असतं''

हॅप्पी बॉयफ्रेंड डे!

''तुझ्यासारखी जोडीदार मिळणे आहे माझे भाग्य

तुझ्यामुळे मिळाली आयुष्य जगण्याची नवी दिशा''

बॉयफ्रेंड डेच्या शुभेच्छा!

Whats_app_banner