National Black Forest Cake Day: घरीच झटपट बनवा ब्लॅक फॉरेस्ट केक, जाणून घ्या रेसिपी!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Black Forest Cake Day: घरीच झटपट बनवा ब्लॅक फॉरेस्ट केक, जाणून घ्या रेसिपी!

National Black Forest Cake Day: घरीच झटपट बनवा ब्लॅक फॉरेस्ट केक, जाणून घ्या रेसिपी!

Mar 28, 2024 10:11 AM IST

Cake Recipe: नॅशनल ब्लॅक फॉरेस्ट डे निमित्ताने आज केकची रेसिपी जाणून घेऊयात.

National Black Forest Cake Day 2024
National Black Forest Cake Day 2024 (freepik)

Black Forest Cake Recipe: २८ मार्चला नॅशनल ब्लॅक फॉरेस्ट डे साजरा केला जातो. मूळतः क्रीम, चेरी, चॉकलेट पासून बनवलेली ही रेसिपी आहे. ब्लॅक फॉरेस्ट केकच्या नेमका कधी बनवायला सुरु झाला माहित नाही. पण काही ऐतिहासिक विद्वानांचा असा विश्वास आहे की केकचा शोध १६व्या शतकात जर्मन शहरात बाडेन-वुर्टेमबर्ग येथे लागला होता. तो काळ आणि ठिकाण केवळ त्याच्या रोमँटिक युगासाठी प्रसिद्ध होता. यामध्येच या गोड चॉकलेट पदार्थाचा समावेश झाला. बाडेन-वुर्टेमबर्ग त्याच्या आंबट चेरी आणि किर्श्वास्सरसाठी देखील प्रसिद्ध होते, जे चेरी ब्रँडी आहे. असे मानले जाते की ब्लॅक फॉरेस्ट केकचे नाव त्यातील अल्कोहोलवरून पडले आहे. 'श्वार्झवाल्ड' हे ब्लॅक फॉरेस्टचे जर्मन नाव आहे आणि ब्लॅक फॉरेस्ट केकला जर्मनमध्ये 'श्वार्झवाल्डर किर्श' म्हणतात. चला नॅशनल ब्लॅक फॉरेस्ट डे निमित्ताने आज केकची रेसिपी जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

१ कप मैदा

१/४ कप कोको पावडर

१ १/४ टीस्पून बेकिंग पावडर

१/४ कप बटर

३/४ कप कॅस्टर साखर

१/४ कप पाणी

२ कप अंडी

१/२ टीस्पून व्हॅनिला एसेन्स

१/८ टीस्पून मीठ

६ इंच गोल बेकिंग टिन

Protein Soup Recipe: नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन सूप, नोट करा हेल्दी रेसिपी!

जाणून घ्या कृती

ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर चाळणीतून चाळून घ्या. यानंतर त्यात लोणी, पिठीसाखर, मीठ, पाणी आणि व्हॅनिला इसेन्स घालून चांगले फेटून घ्या, जेणेकरून मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत. आता या मिश्रणात अंडी फोडून घ्या आणि मिश्रण पूर्णपणे गुळगुळीत होईपर्यंत चमच्याने ढवळा. आता त्याला बटरने ग्रीस करा. यानंतर त्यात केकसाठी तयार केलेले मिश्रण टाका. यानंतर कुकर गॅसवर ठेवा. कमीतकमी ४ मिनिटे पूर्ण आचेवर गरम करा. यानंतर, बेकिंग टिन कुकरमध्ये ठेवा. कुकर रिकामा राहील. आता केक मंद आचेवर मंद शिजू द्या. यास ३० मिनिटे लागू शकतात. आता तुमचा ब्लॅक फॉरेस्ट केक तयार आहे.

Whats_app_banner