National Best Friend Day 2024: का साजरा केला जातो नॅशनल बेस्ट फ्रेंड डे? हा आहे इतिहास आणि महत्त्व
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Best Friend Day 2024: का साजरा केला जातो नॅशनल बेस्ट फ्रेंड डे? हा आहे इतिहास आणि महत्त्व

National Best Friend Day 2024: का साजरा केला जातो नॅशनल बेस्ट फ्रेंड डे? हा आहे इतिहास आणि महत्त्व

Jun 15, 2024 12:12 PM IST

National Best Friend Day 2024: मैत्री आणि मित्रांचा सहवास साजरा करण्यासाठी दरवर्षी ८ जून रोजी नॅशनल बेस्ट फ्रेंड डे साजरा केला जातो. जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

नॅशनल बेस्ट फ्रेंड डे
नॅशनल बेस्ट फ्रेंड डे (Pexels)

National Best Friend Day History and Significance: मित्र हा आपला असा परिवार असतो जो आपण निवडलेला असतो. मित्र आपल्याला आधार देतात, ते आपल्याला प्रोत्साहन देतात ते आपल्या पंखातील बळ असतात. ज्यांच्यासोबत आपल्या बालपणीच्या उत्तम आठवणी आहेत, ते सतत आपल्या पाठीशी असतात आणि ते आपले पार्टनर इन क्राईस सुद्धा असतात. मित्र-मैत्रिणी आपलं आयुष्य सोपं करतात. ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपले ध्येय, आपले स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतात. कधी कधी जेव्हा आपल्याकडे कंपनीसाठी आपले सर्वात चांगले मित्र असतात तेव्हा प्रवास किंवा डेस्टिनेशन महत्वाचे नसते. मित्र आपले जीवन सुंदर बनवतात आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी असतात. 

दरवर्षी नॅशनल बेस्ट फ्रेंड डे आपल्या जीवनात भेटलेल्या आणि आता आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या भागांपैकी एक असलेल्या मित्रांचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. आपली मैत्री आणि मित्रांचा सहवास साजरा करण्यासाठी दरवर्षी ८ जून रोजी नॅशनल बेस्ट फ्रेंड डे साजरा केला जातो. या वर्षीचा खास दिवस साजरा करताना या दिवसाबद्दल आपल्याला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

नॅशनल बेस्ट फ्रेंड डे चा इतिहास

१९३५ साली युनायटेड स्टेट्स काँग्रेसने मैत्री आणि तिचे महत्त्व, सौंदर्य साजरे करण्यासाठी एक दिवस जाहीर केला. आउटडोअर अॅक्टिव्हिटीसाठी हा वर्षातील आदर्श काळ असल्याने ८ जून हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आला. लवकरच नॅशनल बेस्ट फ्रेंड डे इतर विविध देशांमध्ये साजरा केला जाऊ लागला आणि एक जागतिक घटना बनली.

नॅशनल बेस्ट फ्रेंड डे चे महत्व

हा खास दिवस साजरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या मित्रांना एकत्र आणणे आणि ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे त्यांना सांगणे. आपण एकत्र ट्रीप प्लॅन करू शकता. तुमच्या फ्रेड्स ग्रुपला सर्वात जास्त आवडणारे सर्व काही करू शकता. कधी कधी एखाद्या मित्राला फक्त त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी कोणी तरी आवश्यक असते. या नॅशनल बेस्ट फ्रेंड डेच्या निमित्ताने श्रोता व्हा आणि त्यांना जीवनात मार्गदर्शन करा आणि त्यांच्यासाठी उपस्थित रहा, जसे ते नेहमीच आपल्यासाठी असतात.

Whats_app_banner