Baby Girl Name on Sita Mata: सगळा भारत देश सध्या राममय झाला आहे लवकरच अर्थात २२ जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरातील सगळ्याच नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. एवढ्या मोठ्या विशेष सोहळ्यासाठी अयोध्येत विशेष तयारी करण्यात येत आहे. या महिन्यात राम भक्तांच्या घरी कोणताही नवीन मुलगी जन्माला आली तर, तिचे नाव माता सीतेच्या नावावरून ठेवू शकता चला जाणून घेऊयात नावांची यादी…
माता सीतेचा जन्म भूमीतून झाला आणि ती भूमीतच सामावलेली होती. त्यामुळे त्यांना पृथ्वीची कन्या म्हणून ओळखले जाते. यावरून तुमच्या मुलीचे नाव पार्थवी ठेवू शकता.
सीता मातेचे वडील राजा जनक हे महान ज्ञानी होते. त्यांना विदेहराज जनक असेही बोलायचे
यावरून तुम्ही तुमच्या मुलीचे नाव वैदेही ठेवू शकता.
जर तुम्हाला तुमच्या मुलीला लहान आणि साधे नाव द्यायचे असेल तर तुम्ही सिया हे नाव देखील ठेवू शकता. माता सीतेला सिया असेही म्हणतात.
देवी सीतेला जानकी या नावानेही ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव जनक होते. म्हणून तिला जानकी म्हणजेच राजा जनकाची कन्या म्हणूनही ओळखले जाते.
लक्षाकी या नावाचा अर्थ लक्ष्मी स्वरूप आहे. खरतर माता सीतेला लक्ष्मीचा अवतार मानले जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)