Hariyali Puri Recipe: नागपंचमीचा सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी नागांची पूजा केली जाते. तसेच या सणाशी संबंधित अनेक मान्यता आहेत. यापैकी एक मान्यता म्हणजे तवा न वापरण्याची परंपरा. नागपंचमीला अनेक घरांमध्ये गॅसवर तवा वापरला जात नाही आणि पोळी बनवली जात नाही. जर तुमच्या घरातही अशीच श्रद्धा असेल तर तुम्ही पुरी बनवत असाल, तर यावेळी साध्या पुरीऐवजी हरियाली पुरी तयार करू शकता. या पुरीची रेसिपी खूप सोपी आहे. ज्याची चव वेगळी असेल आणि सगळ्यांना आवडेल. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची हरियाली पुरी.
- २ कप गव्हाचे पीठ
- २ चमचे रवा
- २ चमचे बेसन
- १ कप हिरवे वाटाणे
- १ कप कोथिंबीर बारीक चिरलेले
- चवीनुसार मीठ
- हिरवी मिरची बारीक चिरलेली
- लसूण-आले पेस्ट
- हळद
- जिरे पूड
- काळी मिरी पावडर
- गरम मसाला
- आवश्यकतेनुसार तेल
ही पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम फ्रोजन वाटाणे पाण्यात हलके उकळून घ्या. जेणेकरून ते शिजेल. नंतर त्याचे पाणी गाळून घ्या आणि वाटाणे बारीक करून घ्यावे. आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात रवा आणि बेसन मिक्स करा. त्यात हिरव्या वाटाण्याची पेस्ट घाला. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट घालून चांगले मिक्स करावे. तसेच मीठ, हळद, गरम मसाला, काळी मिरी पावडर घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. आता हे पीठ अर्धा तास सेट होण्यासाठी बाजूला ठेवा.
आता या पीठाच्या पुऱ्या लाटून घ्या. तेल गरम करून यात पुऱ्या नीट तळून घ्या. तुमची हरियाली पुरी तयार आहे. गरम गरम पुरी भाजीसोबत सर्व्ह करा.