Historical Places in Delhi: २६ जानेवारी अवघ्या काही दिवसांवर आलं आहे. प्रजासत्ताक दिनाच सेलिब्रेशन सगळीकडे केलं जात. यावेळी २६ जानेवारीला जोडूनच शनिवार रविवार आल्याने हा लॉंग विकेंड आहे. या निमित्ताने तुम्ही कुठेही फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दिल्लीला भेट देऊ शकता. दिल्ली आपली राजकीय राजधानी आहे. दिल्ली हे एक ऐतिहासिक शहर आहे जिथे अनेक राजांनी राज्य केले. या ठिकाणी बांधलेले अनेक किल्ले आहेत. स्वातंत्र्याशी संबंधित काही प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणसुद्धा दिल्लीमधेच आहेत. या ठिकाणी तुम्ही २६ जानेवारीच्या वीकेंडला नक्कीच भेट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात ही कोणती ठिकाणे आहेत.
इंडिया गेट हे दिल्लीमधील प्रिसद्ध ठिकाण आहे. हे ऐतिहासिक ठिकाण पहिल्या महायुद्धात बलिदान दिलेल्या सैनिकांना समर्पित आहे. हे स्मारक भारताच्या इतिहास दर्शवणारं आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. इथे अनेक कार्यक्रमही होतात.
दिल्लीमध्ये स्थित कुतुबमिनार हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हे जगातील सर्वात उंच वीट मिनार आहे जे इस्लामिक वास्तुकला दर्शवते. यामध्ये दिल्लीच्या लोखंडी स्तंभासारख्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वास्तूंचा समावेश आहे.
दिल्लीच्या मध्यभागी असलेले जंतरमंतर ही जागा फारच प्रसिद्ध आहे. हे दिल्लीच्या प्रमुख ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. १८व्या शतकात महाराजा जयसिंग २ यांनी बांधलेली ही खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. दिल्लीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आवड असणारे लोकही जंतरमंतरवर येत असतात.
दिल्लीतील युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेले अजून एक ठिकाण म्हणजे हुमायूंचे मकबरा. हे शहरातील सर्वात प्रतिष्ठित ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. १६व्या शतकात बांधलेली ही भव्य समाधी, मुघल वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
लाल किल्ला ही जागा कोणाला माहित नाही असं होऊ शकत नाही. ही जागा भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो. १७व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला हा भव्य किल्ला आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)