How to take care of malaria: प्रदूषण, हवामान बदल आणि आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. सर्दी, खोकला, तापाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. सरकारी रुग्णालया सोबतच खाजगी रुग्णालयातही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रिपोर्ट्सनुसार या रुग्णांमध्ये जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही आठवड्यांपूर्वीच साथीच्या आजाराने थैमान घातले होते. दरम्यान आता पुन्हा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच सर्दी, ताप, खोकला या आजारांनी त्रस्त केले आहे.
पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली होती. परंतु त्यांनंतर काही आठवडे विश्रांती घेतल्यांनंतर आता पुन्हा एकदा साथीच्या आजाराने डोकं वर काढलेलं दिसत आहे. सध्याच्या माहितीनुसार मुंबईत मलेरिया आणि व्हायरल तापाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. गेल्यावेळी पेक्षा ही संख्या तब्बल १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे यंदा मलेरियाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.मलेरियाबाबत सांगायचे झाले तर सर्वसामान्यपणे सहा ते सात दिवस उपचार घेतल्यानंतर मलेरिया बरा व्हायचा. परंतु आता त्यासाठी थोडा अधिक कालावधी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तर काही रुग्णांना तपासणीमध्ये मलेरिया निगेटिव्ह येऊनसुद्धा लक्षणे मात्र तीच दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. याकाळात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांमध्ये तापाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. तर ३० ते ४० वयोगटातील कामानिमित्त घराबाहेर वावरणाऱ्या लोकांनाही इन्फेक्शन लवकर होत आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगण्यात येत आहे. जे लोक अशक्त आहेत किंवा ज्याची रोग प्रतिकारकशक्ती कमी आहे त्यांना या व्हायरल इन्फेक्शनचा जास्त धोका संभवतो.
-अंगदुखी
-जास्त दिवस ताप
-खोकला
-सर्दी
-मळमळ
- उल्टी
-मास्क घालणे फार महत्वाचे आहे.
-बाहेर फिरताना किंवा घरी आल्यांनंतर सॅनिटायझर वापरा.
-बाहेरून आल्यांनतर अंघोळ करून ते कपडे बदलून घ्या.
- धुळीने भरलेल्या किंवा बांधकामाच्या ठिकाणांपासून दूर राहा.
- थंड अन्नपदार्थ खाणे टाळा.
- कोमट पाणी प्या
- स्व-औषध टाळा
- डॉक्टरांना दाखवूनच औषध घ्या.
(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)