Mumbai News: मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याची मोठी साथ, बचावासाठी लगेच घ्या 'ही' काळजी-mumbai news fever cold cough epidemic in mumbai take this care immediately for prevention ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mumbai News: मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याची मोठी साथ, बचावासाठी लगेच घ्या 'ही' काळजी

Mumbai News: मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याची मोठी साथ, बचावासाठी लगेच घ्या 'ही' काळजी

Sep 12, 2024 10:42 AM IST

Monsoon Diseases: या ऋतूमध्ये साथीचे आजार झपाट्याने वाढतात. त्यामुळे या काळात निरोगी राहण्यासाठी यापासून स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

Viral Infections in Mumbai- मुंबईत व्हायरल इन्फेक्शन
Viral Infections in Mumbai- मुंबईत व्हायरल इन्फेक्शन

Viral Infections in Mumbai:  पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. रखरखत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून दिलासा देणारा पावसाळा आल्हाददायक हवामानासोबतच अनेक आजारही घेऊन येतो. त्यामुळेच सध्या मुंबईत पावसामुळे व्हायरल फ्लू, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या ऋतूमध्ये साथीचे आजार झपाट्याने वाढतात. त्यामुळे या काळात निरोगी राहण्यासाठी यापासून स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही आजारी न पडता पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटायचा असेल तर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. या साथीच्या आजारापासून बचाव करण्याचे काही महत्वाचे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पावसाळ्यात रुग्णांमध्ये वाढ होण्याचे कारण-

अनेक कारणांमुळे पावसाळ्यात साथीच्या आजाराचे रुग्ण वाढतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुख्य कारणांमध्ये वाढलेली आर्द्रता आणि थंड हवामान यांचा समावेश होतो. जे इन्फ्लूएंझा विषाणूंच्या वाढीसाठी आणि पसरण्यासाठी एक अनुकूल वातावरण तयार करतात. त्यामुळेच पावसाळयात साथीचे आजार वेगाने पसरतात.

साथीच्या आजाराची लक्षणे-

-खोकला

-डोकेदुखी

- ताप

-थंडी जाणवणे

-शरीरात वेदना

-घसा खवखवणे

-मळमळ आणि उलट्या

-खूप थकवा

-नाक गळणे

व्हायरल इन्फेक्शनपासून बचावासाठी उपाय-

-ताप, सर्दी, खोकला या व्हायरल इन्फेक्शनचा संसर्ग टाळण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छतेची काळजी घेणे.

-यासाठी नियमितपणे साबण आणि पाण्याने हात धुवा, विशेषत: खोकल्यावर किंवा शिंकल्यानंतर.

-साबण उपलब्ध नसल्यास, हँड सॅनिटायझरदेखील वापरता येईल.

-सतत आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा, विशेषत: डोळे, नाक आणि तोंड, कारण हे विषाणू यामार्गेच शरीरात प्रवेश करतात.

-दरवाजाचे हँडल, लाईट स्विच आणि मोबाईल फोन यासारख्या वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या वस्तूंची स्वच्छता करत रहा.

-याशिवाय, फ्लूची प्रकरणे टाळण्यासाठी, वार्षिक फ्लूची लस अवश्य घ्या.

 

 

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner