Mumbai: मुंबईत हस्तकला कलाकृतींचं भव्य प्रदर्शन, कुर्तीपासून दुपट्ट्यांपर्यंत एकापेक्षा एक डिझाइन्स-mumbai news an exhibition of handicrafts in mumbai all designs from kurtis to dupattas ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mumbai: मुंबईत हस्तकला कलाकृतींचं भव्य प्रदर्शन, कुर्तीपासून दुपट्ट्यांपर्यंत एकापेक्षा एक डिझाइन्स

Mumbai: मुंबईत हस्तकला कलाकृतींचं भव्य प्रदर्शन, कुर्तीपासून दुपट्ट्यांपर्यंत एकापेक्षा एक डिझाइन्स

Sep 13, 2024 01:46 PM IST

Handicraft Designs Clothes: साध्या कापडांवर नाजूक डिझाइन्स असलेल्या विविधरंगी हातमाग कपडे हे हातमागाचं वैशिष्ट्य होय. दरम्यान मुंबईत हस्तकलेचं मोठं प्रदर्शन सुरु आहे .

Indian Handicraft Designs
Indian Handicraft Designs

Handicraft Exhibition in Mumbai:  भारताचा वस्त्रोद्योग वारसा हा तसा फार जुना आहे. बदललेल्या काळातही भारतीय कलाकारीची परंपरा भारतीय जनमानसात अजूनही खोलवर रूजलेली आहे. साध्या कापडांवर नाजूक डिझाइन्स असलेल्या विविधरंगी हातमाग कपडे हे हातमागाचं वैशिष्ट्य होय. दरम्यान मुंबईत हस्तकलेचं मोठं प्रदर्शन सुरु आहे . केवळ महिलांसाठीच्या या कलेक्शनमध्ये कुर्ते, पँट, दुपट्टे, चंदेरी, सिल्क आणि हँड एम्ब्रॉयडरीची वस्त्र प्रदर्शनात सादर करण्यात आली आहेत.

 या प्रदर्शनात प्रसिद्ध हस्त कलाकार कुंदन सिंग बिश्त यांनी हँड ब्लॉक प्रिंटिंगची त्यांची कला यावेळी प्रदर्शित केली. अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी साध्या कापडावर नाजूक डिझाइन्स तयार केल्या आहेत. संपूर्ण कलेक्शनमध्ये अत्यंत बारीक तपशील मांडण्यात आले आहेत. यावेळी कलाकाराकडून नाजूक कारागिरीची माहिती देण्यात आली. इथल्या कलावस्तुंच्या हस्तकलेची समीक्षाही करण्यात आली. यामध्ये कपड्याची ग्रेसफूल रचना, सुंदर टोन्स, आकर्षक एक्सेंट्स आणि समकालीन चित्रे वापरण्यात आली आहेत. त्यातून भारताच्या वस्त्रोद्योग वारशाला चालना मिळणार आहे.

कपड्यांच्या या कलेक्शनमध्ये चंदेरी तसेच सिल्क कपड्यांवर नाजूक ब्लॉक प्रिंट्स दिसून येतात. त्यासोबतच हँड एम्ब्रॉयडरीची वस्त्रे आहेत. त्यातून पारंपरिक कारागिरीवर आधुनिक लुक दिसून येतो. आजच्या काळातील महिलांसाठी डिझाइन करण्यात आलेले हे डिझाईन्स वैविध्यपूर्ण आहेत. आणि त्याचवेळी ते आगळेवेगळेसुद्धा आहेत. यामध्ये रोजच्या कपड्यांसोबतच नाईट सूट्ससुद्धा आहेत. या सर्व डिझाईन्स भारतीय कलाकारीच्या परंपरेत खोलवर रूजलेल्या आहेत.   

जयपोर’च्या क्रिएटिव्ह हेड राधिका छाब्रा या प्रदर्शनाबद्दल म्हणाल्या, ‘जयपोरमध्ये आम्ही कथाकथनाद्वारे कलाकृतींची मांडणी केली आहे. कृष्णा मेहता यांच्यासोबतचे हे कलेक्शन भारताच्या समृद्ध कलाकृतीच्या वारशाला समोर आणण्याच्या आमच्या मोहिमेचे प्रतीक आहे. ही फक्त फॅशन नाही तर आपल्या मूळ गाभ्याबद्दल असलेल्या आमच्या प्रतिष्ठेचे विधान तर आपल्या संस्कृतीची व्याख्या करणाऱ्या अद्भुत कौशल्य व कलाकृतीचा तो उत्सव आहे.”

या समन्वयाबद्दल बोलताना डिझायनर कृष्णा मेहता म्हणाले की,“हे कलेक्शन भारताच्या अद्वितीय वस्त्रोद्योग वारशाप्रति आमचा गौरव आहे. मी कायमच भारतीय वस्त्रोद्योग, कलाकृती आणि आमच्या कलाकारांकडून वापरल्या जाणाऱ्या तंत्रांमुळे भारावून गेलो आहे. जयपोरसोबत मला असा एक भागीदार मिळाला, जो परंपरेला आधुनिकतेशी जोडण्याच्या तसेच कालातीत आणि आजच्या फॅशनबद्दल जागरूक असलेल्या ग्राहकांशी सुसंगत कलेक्शन आणण्याच्या माझ्या स्वप्नाशी जोडला गेला आहे.” विशेष बाब म्हणजे या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसिद्ध पार्श्वगायिका इला अरुण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला लोकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

 

Whats_app_banner
विभाग