Mumbai Local: फक्त ८० रुपयाचे तिकीट काढून संपूर्ण मुंबई फिरा; जाणून घ्या रेल्वेची 'पर्यटन तिकीट योजना'?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mumbai Local: फक्त ८० रुपयाचे तिकीट काढून संपूर्ण मुंबई फिरा; जाणून घ्या रेल्वेची 'पर्यटन तिकीट योजना'?

Mumbai Local: फक्त ८० रुपयाचे तिकीट काढून संपूर्ण मुंबई फिरा; जाणून घ्या रेल्वेची 'पर्यटन तिकीट योजना'?

Dec 19, 2024 11:45 AM IST

Paryatan Tickit Yojna Mumbai: मुंबईमधील ट्राफिक पाहता, लोकलला मुंबईची जीवनदायिनी म्हटले जाते. इतर वाहनांपेक्षा रेल्वेने मुंबईकरांचा प्रवास अगदी सुखद आणि जलद होतो.

Mumbai Local
Mumbai Local (Freepik)

Mumbai Local Scheme In Marathi: मुंबईकरांना प्रवास सोपा आणि आकर्षक बनवण्यासाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई रेल्वे विभागाने एक नवी युक्ती लढवली होती. यामध्ये 'पर्यटन तिकीट योजना' सुरु करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता या योजनेला यश मिळाल्याचं दिसून येत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर मध्ये या योजनेला प्रवाश्यांचा अफाट प्रतिसाद मिळालेला दिसून आला.

या योजने अंतर्गत महसूल विभागाला बराच फायदा झाला आहे. पर्यटन तिकीट अंतर्गत महसूल विभागाला १० लाख ८६ हजार ३१० रुपये जमा झाले आहेत. तसेच नोव्हेंबरमध्ये एकूण ३४ हजार ९२६ प्रवाश्यांनी तिकीट काढून या योजनेचा लाभ घेतला आहे. आता डिसेंबर महिन्यात याला कसा प्रतिसाद मिळत आहे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये विविध उलाढाली होत असतात. यामधीलच एक म्हणजे पर्यटन होय. मुंबईमध्ये जगभरातील लोक भेटी देत असतात. दरम्यान या लोकांना मुंबईतील विविध ठिकाणे पाहायला आवडते. मुंबईमधील ट्राफिक पाहता, लोकलला मुंबईची जीवनदायिनी म्हटले जाते. इतर वाहनांपेक्षा रेल्वेने मुंबईकरांचा प्रवास अगदी सुखद आणि जलद होतो. त्यामुळेच जास्तीत जास्त लोक मुंबईच्या लोकलचा आनंद घेत असतात. त्यामुळेच रेल्वे विभागाने पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि रेल्वेचा प्रवास आणखीन आकर्षक बनवण्यासाठी पर्यटन तिकीट योजना लागू केली आहे.

पर्यटन तिकीट योजना दर-

पर्यटन तिकीट योजनेअंतर्गत नियमित तिकीटांच्या दरापेक्षा कमी दर आकारण्यात येत आहेत. शिवाय या तिकिटात तुम्हाला पूर्ण मुंबई फिरता येणार आहे. दर पुढीलप्रमाणे...

सेकंड क्लास- ८० ते १५० रुपये

फर्स्ट क्लास-२७५ ते ५५५ रुपये

एसी- ३२० रुपयांपासून पुढे

योजनेला मिळालेला प्रतिसाद-

'पर्यटन तिकीट योजना' सुरु करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता या योजनेला यश मिळाल्याचं दिसून येत आहे.

प्रवासी संख्या-३४,९३६

फर्स्ट क्लास- ६४९८

सेकंड क्लास- २५४४०

एसी- २९८८

 

Whats_app_banner