Vanilla Dry Cake Recipe: आईवर प्रेम दाखवण्यासाठी काही खास दिवस नसला तरी प्रत्येक दिवस आईचा असतो. पण मदर्स डे ही प्रत्येक मुलासाठी नक्कीच एक संधी आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आईला स्पेशल फील देऊ शकता. या दिवसासाठी मुले अनेक तयारी करतात. यावर्षी मदर्स डे १२ मे रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी मुले काही सरप्राईज तर काही आईला गिफ्ट देतात. सेलीब्रेशन कोणतेही असले तरी केक ते पूर्ण करते. तुम्ही सुद्धा तुमच्या आईसाठी या मदर्स डेला केक बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ड्राय केकची ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. अंड्याशिवाय देखील हा केक टेस्टी, सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतो. हा केक बनवायला खूप सोपा आहे आणि लवकर तयार होतो. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या कसा बनवायचा ड्राय केक.
- मैदा
- बेकिंग पावडर
- बेकिंग सोडा
- मिक्स नट्स
- कोमट दूध
- लोणी
- कंडेन्स्ड मिल्क
- व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
- कॅस्टर शुगर
ड्राय केक बनवण्यासाठी तुमचा ओव्हन १८०C वर गरम करा. पार्चमेंट पेपरने लोफ पॅन लाईल करा आणि ग्रीस करा. आता एका भांड्यात गरम दूध, मेल्टेड बटर, कंडेन्स्ड मिल्क आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घाला. ते चांगले मिक्स करा. आता त्यात साखर घालून मिक्स करा. नंतर मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या. हे सर्व चांगले मिक्स करा. आता चिरलेले ड्राय फ्रूट्स टाका आणि पुन्हा एकदा मिक्स करा. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्स वापरू शकता.
आता हे ग्रीस केलेल्या टीनमध्ये टाकून बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवा. केक १८०C वर ३५ ते ४० मिनिटे बेक करा. तुमचा टेस्टी ड्राय केक तयार आहे.