मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mother's Day Mocktails: मदर्स डे ला अल्कोहोल शिवाय तयार करा हे मॉकटेल, सोपी आहे रेसिपी

Mother's Day Mocktails: मदर्स डे ला अल्कोहोल शिवाय तयार करा हे मॉकटेल, सोपी आहे रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 12, 2024 02:12 PM IST

Mocktails Without Alcohol: जर तुम्हालाही मदर्स डेच्या दिवशी तुमच्या आईसोबत घरी वेळ घालवायचा असेल तर तुम्ही तिच्यासाठी एक जबरदस्त मॉकटेल तयार करू शकता. येथे पहा तीन प्रकारचे मॉकटेल कसे बनवायचे

मदर्स डेसाठी मॉकटेलची रेसिपी
मदर्स डेसाठी मॉकटेलची रेसिपी (unsplash)

Mocktails Recipe for Mother's Day: प्रत्येक मूल मदर्स डे स्पेशल करण्याचा प्रयत्न करत असतो. यंदा हा दिवस १२ मे रोजी साजरा केला जाणार आहे. तुम्हालाही हा दिवस तुमच्या आईसाठी खास आणि संस्मरणीय बनवायचा असेल तर तुम्ही तिच्यासाठी घरी पार्टीचे आयोजन करू शकता. पार्टीमध्ये विविध प्रकारचे पदार्थ ठेवता येतात. तसेच यावेळी पार्टीमध्ये कोल्ड ड्रिंक्सऐवजी तुम्ही अल्कोहोल शिवाय मॉकटेल तयार करू शकता. हे मॉकटेल घरी बनवणे खूप सोपे आहे. पहा ३ प्रकारचे मॉकटेल कसे बनवायचे

ट्रेंडिंग न्यूज

१. वॉटरमेलन मिंट कूलर

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

- टरबूजचे तुकडे

- लिंबाचा रस

- टरबूज सिरप

- सोडा

- शुगर सिरप

कसे बनवायचे

हे बनवण्यासाठी टरबूजचे तुकडे मॅश करा. नंतर त्यात लिंबाचा रस, साखरेचा पाक किंवा शुगर सिरप आणि टरबूज सिरप घाला. त्यात बारीक केलेला बर्फ घालून एकत्र मिक्स करा. आता सोडा मिक्स करा. हे ड्रिंक टरबूजाच्या तुकड्यांनी सजवा आणि सर्व्ह करा.

२. पेरू कूलर

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

- पेरूचा रस

- ताज्या लिंबाचा रस

- मिरपूड

- मीठ

- टॅबॅस्को

कसे बनवायचे

हे ड्रिंक बनवण्यासाठी पेरूच्या रसात लिंबाचा रस घाला. नंतर काळी मिरी आणि मीठ घाला. आता त्यात टॅबॅस्को आणि बर्फ घालून मिक्स करा. ग्लास सजवण्यासाठी मीठ आणि थाय रेड चिली लावा. मॉकटेल घाला आणि लिंबाच्या स्लाइसने गार्निश करून सर्व्ह करा.

३. व्हर्जिन मोइतो

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

- लिंबाचे तुकडे

- लिंबाचा रस

- पुदिन्याची पाने

- साखर

- व्हाइट कोल्ड ड्रिंक

- सोडा

कसे बनवायचे

हे बनवण्यासाठी बर्फ चांगले कुस्करून घ्या. नंतर त्यात पुदिन्याची पाने, लिंबाचे तुकडे आणि पांढरी साखर कुस्करून टाका. त्यात लिंबाचा रस घाला. बारीक केलेला बर्फ घाला आणि एकत्र मिक्स करा. कोल्ड ड्रिंक टाकल्यानंतर पुदिना आणि लिंबाच्या स्लाइसने सजवा.

WhatsApp channel