मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mother's Day Gift: मदर्स डे ला आईला द्या खास गिफ्ट, ५०० रुपयांत येतील या ५ गोष्टी

Mother's Day Gift: मदर्स डे ला आईला द्या खास गिफ्ट, ५०० रुपयांत येतील या ५ गोष्टी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 12, 2024 09:50 AM IST

Gift Ideas for Mom: मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस १२ मे रोजी आहे. अशा परिस्थितीत आपल्या आईला गिफ्ट देण्यासाठी येथे पहा ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील गिफ्ट आयडिया.

मदर्स डेसाठी गिफ्ट आयडिया
मदर्स डेसाठी गिफ्ट आयडिया (unsplash)

Mother's Day Gift Ideas Under 500: तसं तर प्रत्येक दिवस आईचा असला तरी प्रत्येक दिवस तिच्यासाठी खास बनवणे थोडे अवघड असते. यामुळेच मातृदिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे आईला समर्पित आहे. मदर्स डे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो, यावर्षी १२ मे रोजी मदर्स डे साजरा केला जात आहे. रविवारी मातृदिन साजरा करण्यामागचा एक उद्देश असा आहे की या दिवशी प्रत्येकाला सुट्टी असते आणि अशा परिस्थितीत प्रत्येक मूल आपल्या आईला पूर्ण वेळ देऊ शकेल. प्रत्येक जण आपापल्या परीने हा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न करतो. तथापि, एक गोष्ट सामान्य आहे की या दिवशी प्रत्येक मूल आपल्या आईला एक खास गिफ्ट देते. जर तुम्ही तुमच्या आईसाठी अजून काही खरेदी केले नसेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर येथे पाहा असे गिफ्ट आयडिया जे ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत सहज खरेदी करता येतील.

ट्रेंडिंग न्यूज

एक सुंदर चहा/कॉफी मग

जर तुमच्या आईला चहा किंवा कॉफी पिण्याची आवड असेल, तर तुम्ही तिला एक सुंदर मग भेट देऊ शकता. वास्तविक, बाजारात अनेक प्रकारचे मग उपलब्ध आहेत, जे तुम्ही सहज खरेदी करू शकता. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे कप कस्टमाइज देखील करुन घेऊ शकता. एका चांगल्या मगची किंमत २०० ते २५० रुपये आहे. जर तुम्ही दोन मगचा सेट खरेदी करत असाल तर त्याची किंमतही ३५० ते ४५० रुपयांपर्यंत असेल.

पार्लर कूपन

आईकडे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असतो, पण जेव्हा स्वतःसाठी काही करण्याची वेळ येते तेव्हा ती मागे हटते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आईला पार्लरचे कूपन देऊ शकता. ज्याच्या मदतीने ती काही ब्युटी सर्व्हिस घेऊ शकते. मदर्सडे वर अनेक ठिकाणी ऑफर्स आहेत, त्यामुळे हे गिफ्ट बजेटमध्ये सुद्धा येऊ शकते.

ज्वेलरी होल्डर

अनेकदा तयार होत असताना आईला तिचे आवडते ज्वेलरी किंवा मॅचिंग ईयररिंग्स सापडत नाहीत. तुमच्या आईसोबतही असे होत असेल तर तिला ज्वेलरी होल्डर गिफ्ट करा. त्यात ती तिची रोजची ज्वेलरी सहज ठेवू शकते.

स्किन केअर प्रॉडक्ट्स

तुमच्या आईच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन तुम्ही तिला चांगल्या कंपनीचे स्किन केअर प्रॉडक्ट्स गिफ्ट करू शकता. किंवा तुमची आई वापरत असलेल्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी मागवू शकता.

स्लिंग बॅग

तुम्ही आईसाठी चांगली स्लिंग बॅग घेऊ शकता. ही एक अतिशय उपयुक्त भेट असू शकते. बाजारात जाताना आई आपला फोन घरी ठेवायला विसरली किंवा हातात फोन ठेवायचा असल्यामुळे तो घरी ठेवत असेल तर ही बॅग तिच्यासाठी उपयुक्त ठरेल. या प्रकारच्या बॅगमध्ये फोनसोबत काही रुपये आणि इतर काही वस्तू ठेवता येतात. बाजारात चांगली स्लिंग बॅग २०० ते ५०० रुपयांना मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel