मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mother's Day Celebration: आईसाठी मदर्स डे बनवा खास, अशा प्रकारे प्लॅन करा पूर्ण दिवस

Mother's Day Celebration: आईसाठी मदर्स डे बनवा खास, अशा प्रकारे प्लॅन करा पूर्ण दिवस

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 12, 2024 11:42 AM IST

Mother's Day 2024: आज मदर्स डे आहे. हा दिवस मातांच्या संपूर्ण समर्पणाचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस खास कसा बनवायचा आणि संपूर्ण दिवसाचे नियोजन कसे करायचे ते पहा.

मदर्स डे सेलिब्रेशनसाठी टिप्स
मदर्स डे सेलिब्रेशनसाठी टिप्स (unsplash)

Tips to Make Mother's Day Special: यंदा १२ मे रोजी म्हणजे आज मदर्स डे साजरा होत आहे. महिलांसाठी हा दिवस खूप खास आहे. आईबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात मातृदिन साजरा केला जातो. मुले आईला आपली पहिली गुरू आणि पहिली मैत्रीण मानतात. मदर्स डेच्या विशेष प्रसंगी प्रत्येक मूल आपल्या आईसाठी काहीतरी खास योजना करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालाही मदर्सडे स्पेशल बनवायचा असेल तर तुम्ही या प्रकारे दिवसाचे प्लॅन करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

फुले देऊन मातृदिनाच्या शुभेच्छा द्या

जर तुम्हाला सकाळपासूनच दिवस खास बनवायचा असेल तर तुमच्या आईला फुले देऊन शुभेच्छा द्या. सकाळी उठल्याबरोबर तिला पुष्पगुच्छ द्या आणि तिला मातृदिनाच्या शुभेच्छा द्या.

नाश्त्याने दिवसाची सुरुवात करा

मदर्स डेच्या दिवशी तुमच्या आईसाठी खास नाश्त्याचे प्लॅन करा. आपल्या हातांनी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करा. याशिवाय हेल्दी मीलचे प्लॅन करा. तुम्हाला नाश्ता बनवणे शक्य नसेल तर तुम्ही ब्रंच देखील प्लॅन करू शकता.

दुपारी तुमच्या आईला पँम्पर करा

मदर्स डेच्या दिवशी तुमच्या आईला आरामदायी मसाज, फेशियल, पेडीक्योर आणि मॅनिक्युअर करून तिला पॅम्पर करा. असे केल्याने तुमच्या आईला खूप खास वाटेल. यासोबतच बाहेरच्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करा.

गिफ्ट द्या

प्रत्येकाला भेटवस्तू आवडतात. जर तुम्हाला तुमच्या आईच्या आवडी- निवडी माहित असतील तर तिच्यासाठी एक छान गिफ्ट घ्या. हे केक, ज्वेलरी, हँड बॅग्ज यापैकी काहीही असू शकते. मातृदिनानिमित्त प्रेमाचे प्रतीक म्हणून आईला एक चांगली भेट द्या.

संध्याकाळ बनवा संस्मरणीय

हे आवश्यक नाही की तुम्ही खूप लोकांना आमंत्रित करा आणि नंतर पार्टी करा. मदर्स डे स्पेशल बनवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एक सुंदर संध्याकाळ घालवा. यासाठी थोडी सजावट करा आणि मग काही टेस्टी स्नॅक्स तयार करा किंवा ऑर्डर करा. गाणी वाजवा, डान्स सोबतच काही गेम्स खेळा. याशिवाय तुम्ही तुमच्या आईच्या आवडीचा कोणताही चित्रपट पाहू शकता. मदर्स डे सुपर स्पेशल बनवण्यासाठी केक नक्कीच कापा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग