Happy Mothers Day Wishes: भारतासह इतर अनेक देशांमध्ये, मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो. यावर्षी आईला समर्पित हा खास दिवस १२ मे रोजी साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस साजरा करण्यामागील उद्देश हा आहे की आईच्या निस्वार्थ सेवेबद्दल आणि प्रेमाबद्दल त्यांचा आदर आणि आभार मानणे. तुम्हालाही हा मदर्स डे स्पेशल बनवायचा असेल, तर तुमच्या आईला छान शब्दांत प्रेमाने मदर्स डेच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. पण जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना त्यांच्या भावना सहज व्यक्त करता येत नाहीत, तर तुमच्या हृदयात दडलेल्या गोष्टींना शब्द देण्यासाठी आम्ही तुमच्या आईसाठी हे सुंदर मदर्स डे मॅसेज घेऊन आलो आहोत. हे मॅसेज तुम्ही स्टेटसला सुद्धा ठेवू शकता.
ज्या माऊलीने दिला आम्हांस जन्म,
जिने गायली आपल्यासाठी अंगाई,
आज मातृदिना दिवशी
नमन करितो तुज आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंड पाणी
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई मायेचा पाझर
ती जीवनाचा आधार
तिच प्रेमाचे आगर
तिच्याविना नाही संसार
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू
वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू
अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू
अन् शेवटच्या क्षणापर्यंतचा कुशीतील विसावा तू....
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सगळे दिले मला आयुष्याने
आता एकच देवाकडे मागणे
प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो
यापेक्षा अजून काय हवे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही...
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई तू होतीस म्हणून मी आहे,
माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे
माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते
तेव्हा मी भरून पावतो
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!