Why did Mother Teresa come to India: त्याग आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदर तेरेसा यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना प्रेम आणि शांतीचा दूतदेखील म्हटले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेत घालवले. सन १९७९ मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिकही देण्यात आले होते आणि १९७९ मध्ये मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. निराधारांच्या रक्षक बनलेल्या मदर तेरेसा यांचे ५ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले. आज आपण त्यांच्याबाबत काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
भारतातील गरीब लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या मदर तेरेसा यांचा जन्म मॅसेडोनियामधील अल्बेनियन कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांच्या जन्माच्या एका दिवसानंतर त्याचा बाप्तिस्मा झाला. ही ख्रिश्चनांमध्ये एक धार्मिक प्रक्रिया आहे. त्यामुळे २७ ऑगस्टला त्या आपला वाढदिवस साजरा करत. मदर तेरेसा यांचे खरे नाव 'ऍग्नेस' होते. तिने आपले नाव सोडून तेरेसा हे नाव निवडले.त्यांना संत तेरेसा ऑस्ट्रेलिया आणि तेरेसा ऑफ अविला यांना त्यांच्या नावाने सन्मानित करायचे होते, म्हणून त्यांनी आपल्यासाठी तेरेसा हे नाव निवडले.
मदर तेरेसा यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी घर सोडलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या घरासोबत देशही सोडला होता. त्यांनंतर त्या सिस्टर्स ऑफ लोरेटोमध्ये सामील झाल्या. आणि त्यासाठी त्या आयर्लंडला गेल्या होत्या. यानंतर त्या संपूर्ण आयुष्य कुटुंबीयांना भेटल्या नाहीत. आयर्लंडमध्येच, त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. आणि नंतर जानेवारी १९२० मध्ये त्या भारतात आल्या. येथे, पदवीनंतर, त्यांनी १९३१ मध्ये एक नन म्हणून कठोर प्रशिक्षण घेतले आणि कोलकात्यातील शाळांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
जॉन ग्राफ क्लुकास यांनी लिहिलेल्या चरित्रानुसार, मदर तेरेसा यांच्यावर लहानपणापासूनच मिशनरी जीवनाच्या कथा आणि बंगाल, भारतातील मिशनरींच्या सेवेचा खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी ठरवलं होतं की त्या धर्मासाठी आपलं जीवन समर्पित करतील. वयाच्या १८ व्या वर्षी, जेव्हा ती विटिना लेटनाईसच्या ब्लॅक मॅडोनाच्या मंदिरात प्रार्थना करत होती तेव्हा भारतात येण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ झाला.
मदर तेरेसा यांनी प्रथम सेंट मेरी येथे इतिहास शिकवण्यास सुरुवात केली आणि १५ वर्षे तेथे राहिल्या. गरीबांची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटले. असे सांगितले जाते की, १९४६ मध्ये दार्जिलिंगमधून परतताना त्यांना देवाकडून संदेश मिळाला आहे की त्यांना या देशातील सर्वात गरीब लोकांना मदत करायची आहे. त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. त्यांनी नर्सिंगचा कोर्स केला. त्यानंतर त्या लोकांना मदत करू लागल्या.