Mosquito Bite : डेंग्यू, मलेरियाचे डास नेमके कोणत्या वेळी चावतात माहीत आहे का? असा करा स्वतःचा बचाव
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mosquito Bite : डेंग्यू, मलेरियाचे डास नेमके कोणत्या वेळी चावतात माहीत आहे का? असा करा स्वतःचा बचाव

Mosquito Bite : डेंग्यू, मलेरियाचे डास नेमके कोणत्या वेळी चावतात माहीत आहे का? असा करा स्वतःचा बचाव

Oct 19, 2024 04:58 PM IST

Infectious disease: अद्याप पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अजूनही साथीचे रोग, संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अशातच डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी थैमान घातला आहे.

dengue mosquito
dengue mosquito (freepik)

Epidemic disease:  पावसाळ्यात प्रचंड आजार पसरतात. आता पावसाळा संपून हिवाळा चालू होत असला, तरी अनेक भागात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अजूनही साथीचे रोग, संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अशातच डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी थैमान घातला आहे. डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासांमुळे होणारे आजार खूप धोकादायक ठरू शकतात. या डासांच्या चावण्यापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. हे डास १० हून अधिक धोकादायक आजार पसरवू शकतात. म्हणूनच काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

डास चावल्यामुळे १० हून अधिक आजार पसरतात-

WHO च्या म्हणण्यानुसार, जगभरात डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकांचा जीव जातो. डासांच्या चावण्यामुळे जगभरात १० हून अधिक आजार पसरतात. यापैकी काही डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आहेत. डेंग्यूचे डास नेहमी सकाळी किंवा दिवसा चावतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मलेरिया आणि चिकनगुनियाचे डास कोणत्या वेळी चावतात? तर आम्ही तुम्हाला सांगतो.

मलेरिया-

मलेरियाचे डास रात्री किंवा लोक झोपलेले असताना जास्त चावतात. मलेरिया हा मलेरियाच्या डासांमुळे होतो आणि काही परिस्थितींमध्ये मलेरियाची २५ कोटींहून अधिक प्रकरणे नोंदवली जातात. मलेरियाचे पाच प्रकार आहेत: प्लाझमोडियम फॅल्सीपेरम, प्लास्मोडियम ओव्हल मलेरिया, प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स, प्लास्मोडियम मलेरिया आणि प्लास्मोडियम नोलेसी.

डेंग्यू

डेंग्यू हा एडिस डासांच्या चावण्यामुळे होतो आणि हे डास सकाळी आणि संध्याकाळी जास्त सक्रिय असतात. जेव्हा हवेतील तापमान आणि आर्द्रता जास्त असते. हे डास दिवसाही चावतात, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी डास चावल्यामुळे डेंग्यू ताप, डेंग्यू हेमोरोजेनिक ताप, डेंग्यू शॉक सिंड्रोम असे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

चिकुनगुनिया

चिकुनगुनिया हा एडिस अल्बोपिक्टस डासाच्या चाव्याव्दारे होतो. किंवा हे डास सकाळ-संध्याकाळ कधीही चावू शकतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. चिकुनगुनिया ताप हा चिकुनगुनिया डास चावल्याने होतो आणि सांधेदुखी आणि ताप ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. चिकुनगुनियावर अद्याप कोणताही अचूक उपचार सापडलेला नाही. त्यांच्या लक्षणांवर केवळ अँटीव्हायरल औषधांनी उपचार केले जातात.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner