Morning Habit: सकाळच्या या सवयीचा होतो मेंदूवर परिणाम, नकळत तुम्ही तर करत नाही ना ही चूक?-morning habit of using smartphones right after waking up can affect the brain ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Morning Habit: सकाळच्या या सवयीचा होतो मेंदूवर परिणाम, नकळत तुम्ही तर करत नाही ना ही चूक?

Morning Habit: सकाळच्या या सवयीचा होतो मेंदूवर परिणाम, नकळत तुम्ही तर करत नाही ना ही चूक?

Aug 24, 2023 01:05 AM IST

Unhealthy Morning Habit: आजकाल बहुतेक लोक सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी त्यांचा फोन तपासतात. पण या सवयीचा मेंदूवर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.

सकाळची अनहेल्दी सवय
सकाळची अनहेल्दी सवय (unsplash)

Side Effects of Using Smartphones Right After Waking Up: मोबाईल फोनने आयुष्य सोपे केले आहे आणि आजच्या युगात त्याच्याशिवाय काही करणे कठीण आहे. पण काही सवयींमुळे लोकांना मानसिक त्रास होत आहे. प्रत्येक जण आपली जीवनशैली सुधारण्यासाठी एक चांगले रूटीन निवडतो, ज्यामध्ये मॉर्निंग आणि नाइट रूटीन वेगळी असते. बहुतेक लोक सकाळी उठल्यानंतर लगेचच त्यांचे मोबाईल फोन तपासतात. मेसेज वाचण्यापासून ते सोशल मीडियावरील रिल्स पाहण्यापर्यंत डोळे उघडताच मोबाईल फोन पाहायला लागतात. पण या सवीयचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हालाही ही सवय असेल तर जाणून घ्या या गोष्टी.

मानसिक स्थिती प्रभावित होईल

जेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडताच मोबाईल फोन वापरता तेव्हा तुमचा मेंदू थीटा ब्रेन वेव्हजमधून बीटा ब्रेन वेव्हजमध्ये बदलतो. याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. बहुतेक लोक सकाळी मोबाईल फोनवर सोशल मीडिया चेक करतात. अशावेळी मेंदू डोपामाइन सोडतो. अशा स्थितीत मेंदू त्या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करतो ज्यामुळे डोपामाइन सोडले जाते. अशा परिस्थितीत लोकांना फोन वापरण्याचे व्यसन लागते. काही अहवाल असेही म्हणतात की जे लोक मोबाइल फोन वापरतात ते पुस्तके वाचणाऱ्यांच्या तुलनेत विचार करण्यास अधिक आळशी असतात.

लोक भरकटतात

जेव्हा तुम्ही सकाळी मोबाईल फोन वापरता तर तुम्ही तुमच्या कामातून विचलित होऊ शकता. कारण मोबाईल बघितल्यावर बहुतेकांना वाटतं की ते ५ मिनिटात ठेवतील, पण ही ५ मिनिटं कधी तासात बदलतात हे कळत नाही. अशा वेळी ते तुमचे मन विचलित करू शकते आणि तुमची सकाळची दिनचर्या स्लो करू शकते. सकाळी डोळे उघडताच पहिल्यांदा तुमचा स्मार्टफोन तपासल्याने तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.

तणाव वाढू शकतो

डोळे उघडताच फोन पाहणाऱ्या लोकांचे टेन्शन वाढू शकते. खरं तर सकाळी मोबाईल पाहिल्यावर तुम्हाला असे काही मेल्स किंवा मेसेज दिसतात, ज्याचा तुमच्या मनावर परिणाम होतो. हे तुम्हाला दिवसाची सुरुवात शांततेने करण्यापासून प्रतिबंधित करते आणि तुम्ही दिवसाची सुरुवात करताच तणाव आणि चिंता वाढते.

फोनपासून दूर कसे व्हावे

फोनपासून सुटका करून घेणे कठीण आहे. पण तरी तो सकाळी टाळता येतो. यासाठी काही गोष्टींचे पालन करावे लागेल. जसे की फोनमधील अलार्म ऐवजी घड्याळात अलार्म लावा. स्वत:साठी सकाळचे रूटीन सेट करा, ज्यामध्ये थोडा व्यायाम करा. दिवसाची सुरुवात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाणी पिणे, ध्यान करणे आणि व्यायाम करणे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)