Belly Fat : काही केल्या पोटावरची चरबी कमी होईना? रोज सकाळी ‘हे’ ड्रिंक प्या अन् वाढत्या वजनाची चिंता विसरा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Belly Fat : काही केल्या पोटावरची चरबी कमी होईना? रोज सकाळी ‘हे’ ड्रिंक प्या अन् वाढत्या वजनाची चिंता विसरा!

Belly Fat : काही केल्या पोटावरची चरबी कमी होईना? रोज सकाळी ‘हे’ ड्रिंक प्या अन् वाढत्या वजनाची चिंता विसरा!

Nov 25, 2024 11:11 AM IST

Morning Drink For Belly Fat: जर तुम्ही वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल आणि त्यातच वाढलेले पोट कमी होत नसेल, तर आजपासूनच ‘हे’ पेय पिण्यास सुरुवात करा. आठवडाभरात फरक दिसू लागेल.

Belly Fat : रोज सकाळी ‘हे’ ड्रिंक प्या अन् वाढत्या वजनाची चिंता विसरा!
Belly Fat : रोज सकाळी ‘हे’ ड्रिंक प्या अन् वाढत्या वजनाची चिंता विसरा! (shutterstock)

Morning Drink For Belly Fat: पोटावर वाढलेल्या चरबीमुळे बरेच लोक त्रस्त असतात. आजकालचे धावपळीचे जीवन, त्यात खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, यामुळे अनेकांना पोटावर चरबी वाढल्याची समस्या आहे. यामुळे अनेकदा गॅस, अपचन, पोटफुगी अशा समस्या देखील निर्माण होत असतात. या चरबीवर कोणत्याही व्यायाम किंवा पेयाचा परिणाम होत नाही. जर आपल्याबाबतीत असे होत असेल आणि ओटीपोटावर चरबी दिसून येत असेल, तर ती कमी करण्यासाठी रूटीनमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक्सचा समावेश केला पाहिजे, ज्यामुळे तुमचे फुगलेले पोट कमी होण्यास मदत होईल. दररोज सकाळी आले आणि लवंगाचा चहा पोटावरची चरबी वेगाने कमी करण्यास मदत करू शकतो. हे पेय कसे बनवायचे ते जाणून घ्या…

कसे बनवाल ‘हे’ ड्रिंक?

रोज सकाळी रिकाम्या पोटी हे पेय प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पोटावरची चरबी कमी करणारे हे पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात दोन कप पाणी घेऊन त्यात लिंबाचे अतिशय पातळ तुकडे घालावेत. तसेच, अर्धा चमचा लवंग पावडर आणि काळी मिरी पावडर घालून आल्याचे छोटे तुकडे मिसळावे. आता, हे मिश्रण उकळून ते अर्धे म्हणजेच एक कप होईपर्यंत उकळावे. एक कप चहा अथवा काढा रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. दररोज हे अँटी-इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक प्यायल्याने केल्याने आठवडाभरातच शरीरात फरक दिसू लागेल.

Lose Belly Fat Fast
Lose Belly Fat Fast (Freepik)

खास प्रसंगी दिसलं स्लीम!

दिवाळी आणि तुळशी विवाह समाप्ती झाल्याने आता सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. या लग्नाच्या हंगामात जर तुम्हालाही एखाद्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी स्लिम दिसायचे आहे, तर हा काढा पिऊ शकता. स्लीम दिसण्यासाठी आधी पोटाची चरबी सपाट करावी लागते. यासोबतच चरबी साठू लागल्याचे दिसताच दररोज हे पेय पिण्यास सुरुवात करावी. हे पेय रोज प्यायल्याने आठवडाभरानंतर लगेच त्याचा परिणाम दिसू लागेल.

सूजेवर देखील प्रभावी!

शरीरात पाणी साचण्याची समस्या असल्यास आणि जळजळ कायम राहिल्यास सूज कमी करण्यासाठी हे पेय प्रभावी आहे. या पेयातील आले आणि काळी मिरीच्या साहाय्याने सूज देखील दूर करता येते. आल्यामध्ये जिंजरॉल आणि पेपेरिन नावाचे पदार्थ असतात, जे जळजळ कमी करतात. हेच घटक गॅस आणि सूज देखील दूर करतात, ज्यामुळे पोटाची दिसणारी चरबी लगेच कमी होऊ लागते.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner