Which is Best for Protein: तंदुरुस्त राहण्यासाठी सकस आहाराची सर्वाधिक गरज आहे. प्रथिने आणि भरपूर पोषणयुक्त अन्न शरीर निरोगी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी विशेष योगदान देते. प्रोटीन रिच डायट घेण्यासाठी सामान्यतः अंडी आणि चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेकांना नॉनव्हेज खाणे आवडत नाही. अशा परिस्थितीत त्यांचा आहार कसा असावा, असा प्रश्न पडतो. जेणेकरून त्यांना भरपूर प्रथिने मिळतील. प्रथिने केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर मुलांसाठीही खूप महत्त्वाची असतात. प्रोटीन रिच सोर्ससाठी चिकन हा एकमेव पर्याय नाही. मूग डाळीमध्ये भरपूर प्रथिने आढळतात. जे तुम्ही आरामात खाऊ शकता.
चिकन की मूग डाळ - कोणता आहे प्रोटीन रिच सोर्स
जर आपण चिकन आणि मूग डाळच्या पौष्टिक स्त्रोतांची तुलना केली तर, मूग डाळ मध्ये चिकनपेक्षा २७ टक्के कमी प्रथिने असतात. पण मूग डाळीमध्ये जास्त कॅलरीज उपलब्ध असतात. त्याच वेळी मूग डाळीमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण देखील खूप कमी आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही एका जेवणात चिकन खात असाल तर मूग डाळ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मूग डाळीत फॅट फक्त ३ टक्के असते.
वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे मूग डाळ
वजन कमी करण्यासाठी मूग डाळ सर्वोत्तम पर्याय आहे. त्यात भरपूर फायबर असते. त्याचबरोबर मधुमेहाचे रुग्णही मूग डाळ सहज खाऊ शकतात.
फॅट नसते
जर तुम्हाला सहज पचणारा आहार घ्यायचा असेल तर तुम्ही मूग खाऊ शकता. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, प्रोटीन, व्हिटॅमिन ई, थायामिन आणि फोलेट असते. जे पूर्णपणे निरोगी अन्न म्हणून खाल्ले जाऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला चिकन खायला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात मूग डाळीचा समावेश करू शकता. ते चिकन इतकेच पोषण देईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)