Tips for a monsoon trip: कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आता पावसाळा सुरु झाला आहे. अनेकांना पावसाळा ऋतू प्रचंड आवडतो. पावसाळ्यात निसर्गाची हिरवळ आणि थंड वातावरण अनेकांना भावतो. बहुतांश लोकांना पावसाळ्यात फिरायला जाण्याची इच्छा असते. अशावेळी आधीपासूनच प्लॅनिंग सुरु झालेली असते. लोकांना हिरवळ, तलाव आणि डोंगरदऱ्या यांसारख्या ठिकाणी जायला आवडते. आपल्या व्यस्त जीवनशैली आणि तणावापासून दूर राहण्यासाठी आणि नवीन ठिकाणे शोधण्यासाठी लोक विविध ठिकाणी जातात. पण जर तुम्ही पावसाळ्यात तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
जर तुम्हीही पावसाळ्यात उत्तराखंड, हिमाचल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर आधी तेथील हवामान कसे आहे ते जाणून घ्या. तुमचे तिकडे जाणे व्यर्थ ठरू नये. कारण या ऋतूत बहुतांशी ठिकाणी रेड अलर्ट असतो. तर काही ठिकाणी विशेष काळजी घेऊन जावी लागते.
डोंगराळ भागात कुठेतरी मुक्काम करण्यापूर्वी, पर्वत आणि नदीच्या पायथ्यापासून दूर असलेल्या ठिकाणी हॉटेल निवडणे योग्य राहील. कारण पावसाळ्यात पूर येऊ शकतो शिवाय अनेकवेळा अशा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात जेव्हा तुम्ही फिरायला जात असाल आणि ते ठिकाण अगदीच डोंगराळ भागात असेल. किंवा उत्तराखंड आणि हिमाचलला जात असाल, तेव्हा तुम्ही सतत थोड्या-थोड्या वेळाने आपल्या जवळील एखाद्या तरी व्यक्तीला अपडेट करत राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती आली तर ते तुम्हाला मदत करू शकतील.
पावसाळ्यात डोंगराळ भागात थंडी असते. अशा परिस्थितीत गरम कपडे सोबत घ्या. पावसात भिजणे शक्यतो टाळा. आणि अशी परिस्थिती आलीच तर घालता येतील असे जादाचे कपडे सोबत ठेवा. उबदार कपडे घालण्याचा प्रयत्न करा.
पावसाळ्यात फिरायला जाताना प्रथमोपचार बॉक्स सोबत असणे गरजेचे आहे. यामध्ये बँडेज, जंतुनाशक औषधे, डासांसाठी काही औषधे, डोकेदुखी, पित्त, सर्दी, खोकला, ताप अशी औषधे असणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात अनोळखी भागात जाण्यापूर्वी तिथल्या स्थानिक लोकांचा सल्ला अवश्य घ्या. कारण ते ठिकाण स्थानिक लोकांपेक्षा चांगले कुणालाच माहिती नाही. कुठेही जाण्यापूर्वी त्यांना विचारा की कोणती जागा सुरक्षित आहे आणि कोणती नाही. अशाने तुम्ही अधिक सुरक्षित राहाल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)