Monsoon travel: पावसाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणे आहेत बेस्ट-monsoon travel mahabaleshwar to matheran best travel places in maharashtra ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Monsoon travel: पावसाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणे आहेत बेस्ट

Monsoon travel: पावसाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणे आहेत बेस्ट

Aug 07, 2024 01:33 PM IST

Monsoon travel in Maharashtra: दररोज दगदगीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती म्हणून अनेक लोक शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात जाणे पंसत करतात. परंतु बऱ्याचवेळा ऑफिसमुळे सुट्टीची अडचण, लो बजेट किंवा इतर काही कारणांमुळे आपल्याला दूरचा प्रवास करणे शक्य नसते.

Monsoon travel in Maharashtra
Monsoon travel in Maharashtra

Monsoon travel in Maharashtra:  पावसाळा हा सर्वांचाच आवडता ऋतू असतो. कारण याकाळात चहूबाजूला हिरवागार निसर्ग असतो. अशा वातावरणात आपला थकवा दूर होऊन आपल्या मनाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. पावसाळ्यात सहलीला जाणे हा अनेकांचा छंद असतो. दररोज दगदगीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती म्हणून अनेक लोक शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात जाणे पंसत करतात. परंतु बऱ्याचवेळा ऑफिसमुळे सुट्टीची अडचण, लो बजेट किंवा इतर काही कारणांमुळे आपल्याला दूरचा प्रवास करणे शक्य नसते. परंतु तुम्हाला फार दूर जायची गरजच नाही. कारण आपल्या महाराष्ट्राला निसर्गाचा समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात अशी काही ठिकाणे आहेत जी पावसाळ्यात अगदी स्वर्गाचा अनुभव देता. चला तर मग पाहुयात ही ठिकाणे नेमकी कोणती आहेत.

१) लोणावळा-खंडाळा

महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणांमध्ये लोणावळा-खंडाळ्याचा आवर्जून समावेश होतो. पुणे-मुंबई महामार्गावर असलेले हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे. लोक पाहताच या ठिकाणच्या प्रेमात पडतात. वास्तविक हे थंड हवेचे ठिकाण आहे. मात्र पावसाळ्यातसुद्धा याठिकाणी फिरायला जाणे तितकेच आकर्षक ठरते. त्यामुळे तुम्हाला आपल्या मान्सून ट्रॅव्हल्समध्ये याठिकाणाचा समावेश करायला काहीच हरकत नाही. भुशी डॅम, वाळवळ डॅम, लॉयन पॉईंट, टायगर पॉईंट ही याठिकाणाची काही लोकप्रिय स्पॉट आहेत.

२) माळशेज घाट-

पावसाळ्यात महाराष्ट्राचं निसर्गसौंदर्य आणखीनच खुलतं. यामध्ये माळशेज घाटाचासुद्धा समावेश होतो. माळशेज घाटात अशी कोणती वस्ती वसलेली नाही. परंतु याठिकाणी रोडट्रीपसाठी तुम्ही जाऊ शकता. आजूबाजूला असणारी घनदाट हिरवीगार झाडी आणि त्यातून जाणार लांबसडक रस्ता. अशी या ठिकाणची खासियत आहे. हे ठिकाण अनेकांना भुरळ पाडत असतं. याठिकाणाला पावसाळ्यात एकदा तरी नक्की भेट देऊ शकता.

३) पन्हाळा (कोल्हापूर)

कोल्हापूरपासून अवघ्या २० किमी. अंतरावर हा पन्हाळगड विसावला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणाला सुंदर असा निसर्ग लाभला आहे. पावसाळयात पन्हाळ्याचे सौंदर्य आणखीनच बहरून येते. पन्हाळ्याला हिरवागार निसर्ग पाहण्यासोबतच आपले ऐतिहासिक किल्लेसुद्धा पाहणे अविस्मरणीय ठरते. याठिकाणी अनेक लोक भेटी देत असतात. त्यामुळे वेळात-वेळ काढून पावसळ्यात पन्हाळा सहल करणे सुखद ठरू शकते.

४) माथेरान

मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी माथेरानचा प्लॅन अत्यंत सोयीचा ठरू शकतो. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. परंतु पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य काही औरच असते. याठिकाणी आजूबाजूला असलेली घनदाट झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, टॉय ट्रेनची सफर, घोडेस्वारी या सर्वांनी माथेरानची ट्रिप सफल होते. शहरापासून दूर येऊन निसर्गाच्या सानिध्यात हिंडण्याने ताणतणाव तर दूर होतोच. शिवाय आपल्याला एक नवी ऊर्जा प्राप्त होते. याठिकाणी पॅनारोमा पॉईंट, लुईझा पॉईंट, शार्लोट लेक, सनसेट पॉईंट अशी सुंदर ठिकाणे पाहता येतात.

५) महाबळेश्वर

महाराष्ट्रातील एक सुंदर ठिकाण म्हणजे महाबळेश्वर होय. महाबळेश्वरमध्येही मुसळधार पाऊस पडतो. पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर महाबळेश्वरला जाता येईल. हे ठिकाण पश्चिम घाटात वसलेले आहे. हे हिल स्टेशन हिरवागार निसर्ग, पर्वतरांगा, नैसर्गिक सौंदर्य आणि स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. येथील टेकड्यांवरून कोसळणारे धबधबे आणि हिरव्यागार दऱ्या तुम्हाला आकर्षित करून घेतात.

विभाग