Tricks to Stop Melting Soap: पावसाळ्यात आर्द्रता थोडी जास्तच होऊ लागते. ज्यामुळे बाथरूममध्ये ठेवलेला साबणही वेगाने विरघळू लागतो. याचे कारण म्हणजे या साबणांमध्ये आढळणारे मॉइश्चर एजंट असते, जे त्वचा आणि कपड्यांच्या संरक्षणासाठी असतात. परंतु आर्द्रता आणि दमटपणा येताच हे एजंट उघडे पडतात. साबण वेगाने वितळण्यास सुरवात होते. ज्यामुळे बाथरूममध्ये साबण तर पसरतोच पण लवकर विरघळतो. जर आपल्या बाथरूममधील साबण ओलावा आणि आर्द्रतेमुळे विरघळत असेल तर फक्त ही एक ट्रिक ट्राय करून बघा. हे आपल्या बाथरूममध्ये साबण पसरण्यापासून रोखण्यास मदत करेल आणि साबण जास्त काळ टिकेल.
कपडे धुण्यासाठी जो साबण वापरला जातो, सहसा ते सर्वाधिक आर्द्रता आणि दमटपणामुळे वितळते. बाथरूममध्ये विरघळून पडलेले साबण जितके वाईट दिसतात तितकेच ते धोकादायकही असतात. कारण या पडलेल्या साबणावर पाय पडल्यास घसरून पडण्याची भीती असते. बाथरूममध्ये पडल्याने खूप इजा होऊ शकते. त्यामुळे साबण वितळण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही या ट्रिक्स फॉलो करू शकता.
- बाथरूममध्ये कपडे धुण्याचा किंवा आंघोळीचा साबण अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यावर पाणी पडणार नाही. पाणी पडल्यामुळे साबण वेगाने वितळतो.
- तसेच बाथरूममध्ये दिवसभर ओलावा असेल तर अशा ठिकाणी ठेवलेला साबण कधीही सुकत नाही आणि दिवसभर ओला राहून वितळतो. त्यामुळे साबण कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवावा.
- बाथरूममध्ये जागा असेल तर वापरल्यानंतर साबण खिडकीजवळ ठेवा, जेणेकरून तो लवकर सुकेल.
- जर साबण वितळून जमिनीवर पसरला तर ही ट्रिक तुम्हाला मदत करेल. साबणाचा बॉक्स किंवा चौकोनी प्लॅस्टिकचा डबा घ्या. उभ्या पद्धतीने या बॉक्सला दोन रबर बँड लावा. नंतर त्यावर आपला साबण ठेवा. प्रत्येक वापरानंतर साबण या रबर बँडच्या वर ठेवा. यामुळे साबणाचे विरघळणे कमी होईल. आणि जर विरघळला तरी डब्यात जमा होईल. ज्याचा वापर तुम्ही कपडे धुण्यासाठी सहज करू शकाल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या