Aloo Kurkure Recipe: पावसाळ्यात संध्याकाळी चहासोबत गरमा गरम भजे खायला प्रत्येकाला आवडते. पण जर तुम्हाला नेहमीचे बटाटा आणि कांद्याचे भजे खाण्याचा कंटाळा आला असेल तर या पावसाळ्यात तुमच्या किचनमध्ये ही मान्सून स्पेशल आलू कुरकुरे रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. याशिवाय या रेसिपीची चव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते. ही रेसिपी तुम्ही घरी स्नॅक पार्टीमध्ये बनवून सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया बटाट्याची ही टेस्टी स्नॅक्स रेसिपी आलू कुरकुरे कसे बनवायचे.
- ४ लहान बटाटे
- ३/४ कप मैदा
- ३/४ कप पोहे
- १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- १ टीस्पून जिरे पूड
- थोडी पुदिन्याची पाने
- लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
- आवश्यकतेनुसार तेल
- आवश्यकतेनुसार पाणी
मान्सून स्नॅक्स आलू कुरकुरे बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकळून घ्यावेत. यानंतर उकडलेल्या बटाट्याची साल काढून चांगले मॅश करा. आता या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये चिरलेली पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, जिरे पूड, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व काही चांगले मिक्स करा. आता या तयार केलेल्या मिश्रणातून छोटे छोटे गोळे तयार करा. हे गोळे तळण्यापूर्वी त्याचे कोटिंग तयार करा. त्यासाठी एका बाऊलमध्ये मैदा आणि पाण्याच्या साहाय्याने घट्ट पेस्ट तयार करा. आधीच तयार झालेले गोळे या पेस्टमध्ये बुडवून हलक्या हातांनी पोह्यात गुंडाळून घ्या.
आता मध्यम आचेवर गरम केलेल्या या तेलात बटाट्याचे सर्व गोळे घालून सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत डीप फ्राय करा. तुमचे टेस्टी आलू कुरकुरे तयार आहेत. तुम्ही हे आवडत्या तुम्हाला आवडेल त्या चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करू शकता.