Tomato Soup Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप, पावसाची मजा होईल डबल
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tomato Soup Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप, पावसाची मजा होईल डबल

Tomato Soup Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप, पावसाची मजा होईल डबल

Jul 12, 2024 07:37 PM IST

Monsoon Special Recipe: पावसाळ्याच्या दिवसात गरमा गरम सूप प्यायला आवडत असेल तर घरीच टोमॅटो सूप बनवा. रेस्टॉरंटसारखी चव मिळवण्यासाठी पाहा ही रेसिपी.

टोमॅटो सूप
टोमॅटो सूप (unsplash)

Restaurant Style Tomato Soup Recipe: पावसाळा म्हटलं की गरमा गरम चहा आणि भज्यांची आठवण पहिले येते. या दिवसांमध्ये गरम पदार्थ खायला सर्वांनाच आवडते. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे सूप. बऱ्याच लोकांना रात्री सूप प्यायला आवडते. तुम्हाला सुद्धा रिमझिप पावसासोबत सूपचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करा. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही टोमॅटो सूप अनेकदा प्यायला असाल. तशाच पद्धतीचे सूप तुम्ही सुद्धा घरी सहज बनवू शकता. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप बनवू शकता. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप कसे बनवायचे.

टोमॅटो सूप बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

- टोमॅटो - ३-४

- बटर - १ टीस्पून

- लसूण पाकळ्या - ३-४

- आल्याचा तुकडा - १ इंच

- काळी मिरी

- साखर

- मीठ चवीनुसार

- सजवण्यासाठी ब्रेड

 

असे बनवा टोमॅटो सूप

सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटोचे चार तुकडे करून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात गाजर, बीटरूट किंवा पालक या सारख्या भाज्या सुद्धा घालू शकता. तुम्ही गाजर, बीटरूट टाकणार असाल तर त्याचे साल काढून तुकडे करून घ्या. आता लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे एकत्र सोलून धुवून घ्या. आता एका पॅनमध्ये एक चमचा किंवा दोन चमचे बटर घाला. आता त्यात लसूण, आले सोबत टोमॅटोचे तुकडे टाका. झाकण ठेवून हे टोमॅटो मंद आचेवर शिजू द्या. टोमॅटो शिजल्यावर ते तळाला चिकटून मंद सुवास येईल तेव्हा गॅस बंद करून थोडा वेळ झाकून ठेवा आणि टोमॅटो पूर्णपणे शिजू द्या.

आता टोमॅटोची साल काढून मिक्सरच्या जारमध्ये टाका. सोबत लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे टाका. जर तुम्हाला गाजर, बीटरूट, पालक अशा इतर काही भाज्या घालायच्या असतील तर त्याही उकळून घ्या. त्या भाज्या सुद्धा टोमॅटोसोबत मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. जर पेस्ट घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घाला. आता चाळणीच्या साहाय्याने या जाडसर पेस्टला गाळून घ्या. तुम्हाला एकदम स्मूद सूप मिळेल. आता त्यात थोडी साखर घाला. त्यासोबत मीठ आणि काळी मिरी पावडर घालून चांगले मिक्स करा. तुमचे टोमॅटो सूप तयार आहे. यात ब्रेडचे क्रुटॉन्स टाकून गार्निश करा आणि गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner