Paneer Manchurian: पावसाची मजा वाढवेल ड्राय पनीर मंचुरियन, इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Paneer Manchurian: पावसाची मजा वाढवेल ड्राय पनीर मंचुरियन, इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे रेसिपी

Paneer Manchurian: पावसाची मजा वाढवेल ड्राय पनीर मंचुरियन, इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे रेसिपी

Jul 08, 2024 04:50 PM IST

Evening Snacks Recipe: पावसाळ्यात संध्याकाळी चहासोबत गरमा गरम स्नॅक्स खायला सर्वांनाच आवडते. अशा वेळी तुम्ही ड्राय पनीर मंचुरियन बनवू शकता. पाहा रेसिपी.

ड्राय पनीर मंचुरियन रेसिपी
ड्राय पनीर मंचुरियन रेसिपी (freepik)

Dry Paneer Manchurian Recipe: रिमझिम पावसासोबत गरमा गरम चहा आणि चटपटीत स्नॅक्स खायला कोणाला आवडत नाही. पावसाळा म्हटलं की सर्वात पहिले विचार येतो तो भज्यांचा. पण तुम्हाल भजे खायचे नसतील आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही ड्राय पनीर मंचुरियन बनवू शकता. तुम्ही काही टिप्स फॉलो करून ते घरी सहज बनवू शकता. चायनीज खायला आवडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ड्राय पनीर मंचुरियनची ही रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग इव्हनिंग स्नॅक्ससाठी ड्राय पनीर मंचुरियन कसे बनवायचे ते जाणून घ्या.

ड्राय पनीर मंचूरियन बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- २५० ग्रॅम पनीर (चौकोनी तुकड्यांमध्ये कापलेले)

- ३ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर

- १ टेबलस्पून मैदा

- १ शि मला मिरची

- १ कांदा

- १/४ कप हिरवा कांदा

- ३ हिरवी मिरची

- १ टेबलस्पून आले लसूण पेस्ट

- २ टेबलस्पून टोमॅटो सॉस

- २ टेबलस्पून सोया सॉस

- २ टेबलस्पून ग्रीन चिली सॉस

- तेल तळण्यासाठी

- मीठ चवीनुसार

- पाणी आवश्यकतेनुसार

असे बनवा ड्राय पनीर मंचूरियन

हे बनवण्यासठी सर्वप्रथम एका बाऊल मध्ये कॉर्न फ्लोअर, मैदा, अर्धा टेबलस्पून आले लसूण पेस्ट, मीठ घ्या. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याचे घट्ट बॅटर तयार करा. आता या बॅटरमध्ये पनीरचे तुकडे मॅरिनेट करून १५ ते २० मिनीटे बाजूला ठेवा. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे त्यात टाका आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. तुम्हाला डीप फ्राय नको असेल तर तुम्ही ते कमी तेलात शॅलो फ्राय सुद्धा करू शकता.

आता शिमला मिरची, कांदा, हिरवा कांदा, हिरवी मिरची हे नीट बारीक कापून घ्या. पनीर तळल्यानंतर उरलेल्या तेलात आले लसून पेस्ट टाका. नंतर त्यात शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची टाकून मिक्स करा. आता यात बाकीचे मसाले आणि सर्व सॉस टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात तळलेले पनीरचे तुकडे टाका. हे नीट मिक्स करून घ्या आणि साधारण २ ते ३ मिनीटं ते शिजू द्या. हिरव्या कांद्याने गार्निश करून गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner