Maggi Samosa Recipe: रिमझिम पावसात बाहेर बाल्कनीत बसून चहासोबत काही चटपटीत स्नॅक्स खाणे म्हणजे चहा आणि पाऊस दोन्हीची मजा द्विगुणित होते. पावसाळ्यात तुमची चटपटीत खाण्याच्या क्रेविंगचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी एक पूर्णपणे वेगळी आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचं नाव आहे मॅगी समोसा. आजपर्यंत तुम्ही बटाटे, पनीर अशा गोष्टींपासून बनवलेले अनेक प्रकारचे समोसे खाल्ले असतील. पण मॅगी समोसाची ही रेसिपी बाकीच्या समोसा रेसिपीपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि चविष्ट आहे. या रेसिपीची विशेषता म्हणजे ती बनवायला सोपी आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घ्या पावसाची आणि चहाची मजा वाढवण्यासाठी मॅगी समोसा कसा बनवायचा.
- ३०० ग्रॅम मैदा
- १ कप मॅगी नूडल्स
- १ टीस्पून कॉर्न स्टार्च
- २ टेबलस्पून बारीक चिरलेला हिरवा कांदा
- २ टेबलस्पून गाजर
- १/४ कप कोबी
- २ चमचे बीन्स
- १ टीस्पून शिमला मिरची
- १/२ चमचा आलं
- १/२ चमचा लसूण
- १/२ टीस्पून ओवा
- १ टीस्पून रेड चिली सॉस
- २ टेबलस्पून सोया सॉस
- २ कप पाणी
- आवश्यकतेनुसार तेल
- चवीनुसार मीठ
मॅगी समोसा बनवण्यासाठी आधी मॅगी नूडल्स उकळून बाजूला ठेवा. तसेच समोसासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या बारीक चिरून ठेवा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात आले, लसूण आणि चिमूटभर मीठ घालून चांगले परतून घ्यावे. आता त्यात चिरलेल्या भाज्या, रेड चिली सॉस आणि सोया सॉस घालून चांगले मिक्स करा. भाज्या थोडा वेळ भाजल्यानंतर हिरवा कांदा टाका आणि मध्यम आचेवर ५ मिनिटे परतून घ्या. नंतर कढईत कॉर्न स्टार्च घालून सर्व काही चांगले मिक्स करा. आता कढईत मॅगी नूडल्स घालून सर्व मिक्स करा आणि साधारण ३-४ मिनिटे शिजवा.
आता एका भांड्यात मैदा, ओवा, मीठ, थोडे तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्या. हे झाकून ३० मिनिटे बाजूला ठेवा. अर्ध्या तासानंतर या पीठाचे गोळे लाटून पुरीचा आकार द्या. आता याच्या कडेला पाणी लावून याचे पॉकेट बनवा. या तयार केलेले नूडल्स भरून कडा नीट बंद करा. आता एका कढईत तेल गरम करून समोसा सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तुमचे टेस्टी मॅगी समोसा तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या