Palak Pakora: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत पालकाची भजी, चहाची मजा द्विगुणीत करेल रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Palak Pakora: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत पालकाची भजी, चहाची मजा द्विगुणीत करेल रेसिपी

Palak Pakora: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत पालकाची भजी, चहाची मजा द्विगुणीत करेल रेसिपी

Jul 15, 2024 06:38 PM IST

Monsoon Special Recipe: पावसाळा म्हटला की भज्यांचा विषय सर्वप्रथम येतो. चहासोबत भजे खायचे असतील तर पालकाची भजी बनवा. ही रेसिपी खूप सोपी आहे.

पालकाची भजी
पालकाची भजी (freepik)

Crispy Palak Pakora Recipe: पावसाळा सुरु झाला की चहासोबत गरमा गरम भजी खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. संध्याकाळच्या वेळी पावसाची मजा घेत चहा आणि भज्यांचा आस्वाद घेतला जातो. तुम्ही सुद्धा भजी बनवण्याचा विचार करत असाल तर पालकाच्या भज्यांची ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कुरकरीत पालकाची भजी खायला खूप टेस्टी आणि बनवायला सोपी आहेत. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही झटपट स्वादिष्ट पालकाची भजी बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या रेसिपी.

पालकाची भजी बनवाण्यासाठी साहित्य

- पालकाचे पानं - १५

- बेसन - ३/४ कप

- तांदळाचे पीठ - २ टीस्पून

- लाल तिखट - १/२ टीस्पून

- हळद - १/२ टीस्पून

- आले-लसूण पेस्ट - १ टीस्पून

- बारीक चिरलेली कोथिंबीर - २ टीस्पून

- बारीक चिरलेल्या मिरच्या - १ टीस्पून

- बेकिंग सोडा - चिमूटभर

- चाट मसाला - १ टीस्पून

- लिंबाचा रस - १ टीस्पून

- मीठ - १/२ टीस्पून

- तेल - आवश्यकतेनुसार

पालकाची भजी बनवण्याची पद्धत

भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक नीट धुवून घ्या आणि त्याची फक्त पानं तोडून घ्या. पालकाची पाने स्वच्छ कापडाने नीट पुसून घ्या. आता एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, आल्याची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची, बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करा. नंतर यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ तयार करा. आता कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर कमी करा. आता पालकाची पाने एक एक करून आधी तयार केलेल्या बॅटरमध्ये बुडवून मग नंतर गरम तेलात घाला. एका वेळी कढईत पाच ते सहा पाने घाला. पालकाची पाने दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत नीट तळून घ्या. 

आता हे कढईतून काढून टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये ठेवा. सर्व पकोडे याच पद्धतीने तळून घ्या. भजीवर चाट मसाला शिंपडून आपल्या आवडत्या चटणीबरोबर किंवा चहासोबत गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner