Beauty Tips to Get Glowing Skin in Humid Weather: हवामानातील बदलाचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेवर सुद्धा होतो. पावसाळा उष्णतेपासून दिलासा तर देतो, पण सोबतच वातावरणात ओलावा आणि आर्द्रता देखील निर्माण करतो. या ऋतूत जास्त घाम आल्याने अनेक लोकांना पुरळ, एक्ने, तेलकटपणा आणि काळेपणा यासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांचा अधिक त्रास होतो. ज्यामुळे चेहऱ्याची चमक कमी होऊ लागते. पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक असते. आपण आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये काही बदल करून या समस्येवर मात करू शकतो. काही सोप्या गोष्टी करून आपण पावसाळ्यात सुद्धा ग्लोइंग स्किन मिळवू शकतो. चला जाणून घेऊया पावसाच्या दमट हवामानात चेहऱ्याची चमक कशी टिकवून ठेवावी.
दहीचा प्रभाव थंड असल्यामुळे पावसाळ्यात त्याचे सेवन करण्यास मनाई केली जाते. पण दमट हवामानात चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. दहीमध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. दह्याचा हा उपाय करण्यासाठी रोज दह्याने चेहऱ्याला मसाज करा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा.
पपई केवळ खाण्यापुरतेच नाही तर चेहऱ्यावर लावल्याने सुद्धा अनेक फायदे मिळतात. पपई सावळा रंग सुधारून गोरा करण्यास मदत करते. पपईमध्ये असलेले गुणधर्म नैसर्गिक ब्लीचसारखे काम करतात. पपईचा उपाय करण्यासाठी पपईचा तुकडा घेऊन चेहऱ्यावर १० मिनिटे नीट लावावे. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
आर्द्रतेपासून आराम मिळवण्यासाठी आणि चेहऱ्याचा ग्लो सुधारण्यासाठी आपण कच्च्या केळीची पेस्ट देखील लावू शकता. हा उपाय करण्यासाठी केळी मॅश करून दुधात मिसळून फेस पॅक तयार करावा. आता हे १० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसांनी तुम्हाला दिसेल की हळूहळू चेहऱ्याचा रंग साफ होऊ लागला आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या