How to choose sunscreen: आपल्या चेहऱ्याची त्वचा फारच संवेदनशील असते. त्यामुळेच त्वचेवर नैसर्गिक क्रियांचे परिणाम लगेच दिसू लागतात. यामध्ये चेहऱ्यावर सूर्याच्या हानिकारक किरणांचे परिणाम अत्यंत नकारात्मक असू शकतात. सूर्यकिरण चेहऱ्याला खूप लवकर प्रभावित करते. कारण ती त्वचा त्याच्या थेट संपर्कात येते. त्वचेचा रंग, सनबर्न, काळे डाग, सूर्यप्रकाशासोबतच त्वचेच्या कर्करोगासारखे घातक आजार होऊ शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी सूर्यापासून संरक्षणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेवर सनस्क्रीन लावणे. सनक्रीनमुळे सूर्याच्या घातक परिणामांपासून आपल्या त्वचेचा बचाव करण्यास मदत होते.
आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या सनस्क्रीन उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार आणि सोयीनुसार सनस्क्रीन निवडू शकता. इतकंच नाही तर सनस्क्रीन निवडण्याआधी हवामान लक्षात घेणं गरजेचं आहे. पावसाळा सुरू झाला आहे आणि या ऋतूत वातावरणातील आर्द्रता वाढते, हे लक्षात घेऊन तुम्ही तुमचा सनस्क्रीन निवडावा. योग्य ऋतूनुसार योग्य सनस्क्रीन निवडल्यास चेहऱ्याच्या जवळपास सर्वच समस्या दूर होतील. आज आपण जाणून घेऊया की कोणते सनस्क्रीन पावसाळ्यात अधिक प्रभावी ठरू शकते.
फिजिकल सनब्लॉक त्वचेच्या वर असते आणि सूर्याची किरणे परावर्तित करते. खनिजे टायटॅनियम डायऑक्साइड आणि झिंक ऑक्साईड हे फिजिकल सनस्क्रीनमधील मुख्य सक्रिय घटक आहेत. या सनस्क्रीन आरोग्याच्या दृष्टीने जास्त सोयीस्कर समजल्या जातात.
केमिकल सनस्क्रीन त्वचेमध्ये शोषून घेतल्या जातात. आणि नंतर अतिनील किरण शोषून घेतात. ते अतिनील किरणांना हिटमध्ये रूपांतरित करते आणि शरीरातून बाहेर टाकते. केमिकल सनस्क्रीनमध्ये ॲव्होबेन्झोन, ऑक्टिनॉक्सेट आणि ऑक्सीबेन्झोन सारखे सक्रिय घटक असतात.
बहुतांश लोक पावसाळ्यात सनस्क्रीन लावणे बंद करतात, ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण आकाशातील ढग सूर्याला लपवू शकतात, परंतु त्याच्या हानिकारक अतिनील किरणांचा प्रभाव कमी करू शकत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यातसुद्धा सनस्क्रीन लावणे तितकेच गरजेचे असते. शिवाय पावसाळ्यात सनस्क्रीन निवडताना आपल्या त्वचेच्या पोतनुसार निवडावी. त्यामुळे तुम्हाला त्याचा विशेष लाभ मिळू शकतो.
पावसाळ्यात सनस्क्रीन निवडताना, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे त्वचेतून जास्त तेल निघू शकते. अशा परिस्थितीत तेलविरहित आणि नॉन-कॉमेडोजेनिक सनस्क्रीन निवडा. स्टिक आणि पावडर सनस्क्रीन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. कारण त्यात तेल नसते, याशिवाय तुम्ही जेल किंवा वॉटर बेस्ड रेग्युलर सनस्क्रीनही लावू शकता. याशिवाय ब्रँड स्पेक्ट्रम सनस्क्रीन किमान ३० SF सह लावा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही SPF ५० किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन देखील लावू शकता. परंतु ३० पेक्षा कमी एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरू नका.
जर तुम्ही पावसाच्या पाण्यात भिजत असाल, किंवा आर्द्रतेमुळे जास्त घाम येत असेल आणि तुमचा चेहरा पुन्हा पुन्हा स्वच्छ करावा लागत असेल, तर दर २ तासांनी सनस्क्रीन लावा. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर स्टिक सनस्क्रीन सहज लावू शकता. हे चिकट नसतात आणि त्वचेला तजेलासुद्धा देतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)