एप्रिल- मे महिन्यात उष्णतेच्या लाटेमुळे सर्वजण हैराण झालेले असतात. त्यामुळे जून महिना उजाडला की नागरिकांना दिसाला मिळतो. कारण पावसाळा हा ऋतू सुरु होतो. या ऋतूचा अनेक कपल किंवा कुटुंबीय आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. ठिकठिकाणी सुरु असलेल्या धबधब्यांवर जाणे ही पर्वणी ठरते. त्यामुळे जर तुम्हाला महाराष्ट्रात परदेशातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा...
महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक सौंदर्याची खाण म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात तर संपूर्ण महाराष्ट्राचे सौंदर्य हे पाहण्यासारखे असते. सगळीकडील हिरवळ, तसेच तुडुंबल भरलेले नदी-नाले, सुंदर धबधबे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. पावसाळ्यात या सुंदर धबधब्यांना नक्की भेट द्या. कारण हे धबधबे तुम्हाला परदेशी ठिकाणाचा अनुभव देतील. त्यांच्या सौंदर्यावर एक नजर टाकूया...
वाचा: डेंग्यू झाल्यामुळे प्लेटलेटची संख्या कमी झाली आहे? मग 'हे' पदार्थ नक्की खा
महाराष्ट्रातील नाशिक येथील अंजनेरी येथील नैसर्गिक सौंदर्य म्हणजे जणू काही चमत्कारच आहे. पावसाळ्यात हे ठिकाण इतके सुंदर दिसते की तुम्ही गेल्यावर कळेलच. पावसाळ्यात नाशिकला नक्की सहलीला जा.
महाराष्ट्रातील नाणेघाट धबधबा हा पावसाळ्यातील आकर्षण ठरते. हे ठिकाण मुंबईपासून जवळपास ३ तासाच्या अंतरावर आहे. हा धबधबा जवळपास २००० फूट उंचीवर आहे. तसेच हे महाराष्ट्रातील आश्चर्य मानले जाते. पावसाळ्यात या धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. येथे ट्रेकिंगची देखील मजा घेता येते. त्यामुळे धबधब्यावर भिजण्याचा आनंदासोबतच ट्रेकिंग देखील होते.
वाचा: गर्दीपासून लांब कुठे तरी शांत ठिकाणी जायचे? मग ठाण्याजवळील ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या
लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वरच्या सर्वाधिक भेट दिलेल्या हिल स्टेशनपैकी एक आहे. हा धबधबा अतिशय प्रसिद्ध असून अनेक पर्यटन येथे गर्दी करताना दिसतात. या धबधब्यांचा मुख्य स्त्रोत वेण्णा व्हॅली आहे, जिथून 600 फूट उंचीवरून पाणी कोसळते. या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर दृश्य पाहायला मिळेल.
पावसाळा संपण्यापूर्वी महाराष्ट्रातील कावळशेत पॉइंटला नक्की भेट द्या, कारण पावसाळ्यात या ठिकाणाचे सौंदर्य द्विगुणित होते. इथे कोसळणारा धबधबा आणि हिरवळ अतिशय मनमोहक आहे.
वाचा: कैरीचं लोणचं खाण्यासाठी पाहावी लागणार नाही जास्त वाट, या रेसिपीने इंस्टंट बनवा
महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर असलेल्या गोवा येथे देखील धबधबा आहे. हा धबधबा सुमारे १०२० फूट उंचीचा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अजूबाजूच्या राज्यातील लोक गर्दी करतात. हा धबधबा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतात.
जुन्या पुणे-मुंबई मार्गावर लोणावळा आणि खंडाळा येथे अनेक धबधबे आहेत. या ठिकाणी अनेक बाईकसवार फिरण्यासाठी आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी जाताना दिसतात. येथे असलेल्या एका धबधब्याची उंची ही ६५९ फूट आहे. या धबधब्याचे नाव कुन फॉल्स असे असून येथील धबधब्याचे पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र दिसते.
संबंधित बातम्या