पावसाळ्यात हवामानात विविध बदल घडून येतात. त्यानुसार अनेक गोष्टींचा उद्रेकही वाढतो. यामध्ये माशांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
पावसाच्या दिवसांमध्ये घरात सतत माशांचा प्रादुर्भाव वाढतो. प्रत्येक गोष्टींवर माशा घोंघावताना दिसून येतात. काहीवेळा लोक माशांच्या घोंघावण्याने त्रस्त होऊन जातात. तर काही लोकांना ते अतिशय घाण वाटू लागते. आज आपण पावसाळ्यात माशांचा उद्रेक कमी करण्यासाठी करता येणारे सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत. जेणेकरून तुमचा पावसाळा मजेत आणि निरोगी जावा.
(Freepik)लिंबू- एका स्प्रे बाटलीत पाणी घालून त्यात एक लिंबू पिळून घ्यावा. त्यानंतर त्यात मीठ मिसळावे. हे सर्व मिश्रण नीट एकत्र करून घ्यावे. आणि ते पाणी स्प्रे बाटलीच्या मदतीने घरभर शिंपडावे. असे केल्याने माशा येणार नाहीत.
कापूर- कापूर आपल्या सर्वांकडे उपलब्ध असतो. कापूरचे काही तुकडे घेऊन ते पेटवावे आणि त्याचा धूर करावा. कापूरच्या धुराने माशा पळून जातात.
तमालपत्र- तमालपत्र हे एक मसाल्याचे पदार्थ आहे. मात्र याच्या वापराने माशांचा त्रास कमी होतो. तमालपत्र जाळून माशा असणाऱ्या ठिकाणी त्याचा धूर करावा. अशाने माशा अजिबात येणार नाहीत.