Monsoon Health Tips: पावसाळ्यातही घामाचा दुर्गंध येऊन अंगाला खाज सुटतेय? 'या' सोप्या उपायांनी लगेच मिळेल आराम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Monsoon Health Tips: पावसाळ्यातही घामाचा दुर्गंध येऊन अंगाला खाज सुटतेय? 'या' सोप्या उपायांनी लगेच मिळेल आराम

Monsoon Health Tips: पावसाळ्यातही घामाचा दुर्गंध येऊन अंगाला खाज सुटतेय? 'या' सोप्या उपायांनी लगेच मिळेल आराम

Published Aug 01, 2024 02:53 PM IST

Tips to Get Rid Of Sweat Smell and Itchy Skin: पावसाळ्यात स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतल्यानंतरही अनेकांच्या अंगातून एक प्रकारचा वास येतो. त्यामुळे काही लोकांच्या अंगावर खाज येत राहते. या दोन्ही गोष्टींमुळे शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.

घामाने येणारी दुर्गंधी कशी दूर करावी?
घामाने येणारी दुर्गंधी कशी दूर करावी? (Shutterstock)

Tips to Get Rid Of Sweat Smell and Itchy Skin:  पावसाळ्यात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत असला, तरी अनेकांची घामाच्या धारांमुळे स्थिती बिकट होते. पावसाळ्यात स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतल्यानंतरही अनेकांच्या अंगातून एक प्रकारचा वास येतो. त्यामुळे काही लोकांच्या अंगावर खाज येत राहते. या दोन्ही गोष्टींमुळे शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. खरं तर, या दोन्ही अगदी सामान्य समस्या आहेत. वास्तविक, घाम येणे ही एक शारीरिक क्रिया आहे. मात्र काही लोकांना त्याचा थोडा जास्त परिणाम होतो. अशात अनेकांना त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात. यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी पुढील काही पद्धतींचा अवलंब करता येईल.

घामातून येणारी दुर्गंधी

जेव्हा तुमच्या अंगाला येणारा घाम त्वचेवर असलेल्या बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो तेव्हा शरीराला दुर्गंधी येते. विज्ञान अभ्यासानुसार घामाचा स्वतःचा वास नसतो. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल कि, मग तुमच्या शरीरात घामाची दुर्गंधी कशी येते. तर तुमच्या शरीरावर असणारे बॅक्टेरिया घामासोबत मिळून दुर्गंध निर्माण करतात. तुमच्या शरीरावर कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत त्यानुसार तुमच्या शरीरातून घामाचा वास येत असतो. त्यामुळेच काहींच्या घामामधून साधारण वास येतो तर काहींना घामामुळे प्रचंड दुर्गंधी येते.

घामातून येणाऱ्या दुर्गंधीवर उपाय

१) घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळण्यासाठी २ चमचे टी ट्री ऑईल आणि २ चमचे पाणी मिसळा. आता हे मिश्रण अंडर आर्म्सच्या भागावर लावा. हे एक नैसर्गिक अँटिसेप्टिक आहे. हे मिश्रण लावल्यानंतर तुम्हाला लगेच फरक दिसेल.

२) घामाचा वास दूर करण्यासाठी तुम्ही सफरचंदपासून बनलेले अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरू शकता. शिवाय यापासून संसर्ग दूर होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा अ‍ॅपल साईडर व्हिनेगर घ्या आणि त्यात सुमारे अर्धा चमचा कोरफडीचे जेल घाला. अंडरआर्म्सवर काही वेळ लावा आणि नंतर पाण्याने धुवा. अशाने दुर्गंधी तर दूर होईलच शिवाय तुम्हाला कोणतीच अ‍ॅलर्जीही होणार नाही.

३)शरीरातून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडासुद्धा मदत करतो. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून त्यात थोडेसे पाणी घालून घाम येणाऱ्या भागावर लावा. काही वेळ ठेऊन स्वच्छ पाण्याने धुवून टाका.

 

घामामुळे खाज सुटण्यावर उपाय

१) घामामुळे अंगाला खाज येत असेल तर बर्फाचा तुकडा कपड्यात गुंडाळा आणि त्या घाम येणाऱ्या भागावर लावा. असे केल्याने तुमच्या शरीराला खूप आराम मिळेल. तुम्हाला हवे असल्यास, बर्फ गोठवताना तुम्ही त्यात कोरफडीचे जेल किंवा काकडीचा रस घालू शकता. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होणार नाही.

२) घामामुळे खाज सुटण्यावर बेकिंग सोडासुद्धा वापरता येतो. बेकिंग सोडा तुमच्या त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते. हे खाज सुटणे आणि जळजळ कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि नंतर त्यात काही थेंब पाणी टाकून पेस्ट बनवा. यानंतर तुम्ही ते खाज येत असलेल्या भागावर लावा. थोडा वेळ ठेवा आणि स्वच्छ करा.

 

Whats_app_banner