मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Monsoon Care Tips: पावसाळ्यात त्रास देऊ शकतात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या, या उपायांनी मिळेल आराम

Monsoon Care Tips: पावसाळ्यात त्रास देऊ शकतात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या, या उपायांनी मिळेल आराम

Jun 28, 2024 11:13 AM IST

Monsoon Skin and Hair Care Tips: पावसाळ्यात बहुतांश लोकांना त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात त्वचा आणि केसांशी संबंधित कोणत्या मोठ्या समस्यांचा त्रास होतो आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत हे जाणून घेऊया.

पावसाळ्यात त्वचा आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी टिप्स
पावसाळ्यात त्वचा आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Fix Skin and Hair Problems in Rainy Season: कडक ऊन आणि उष्णतेपासून आराम देणारा पावसाळा अनेकदा त्वचा आणि केसांसाठी समस्या म्हणून येतो. या ऋतूत वातावरणातील ओलावा, आर्द्रता आणि प्रदूषण वाढल्याने लोकांना हर्पीस, एक्झिमा, खाज सुटणे, पिंपल्स, फंगल इन्फेक्शन, पुरळ आणि एथलिट फूट यासारख्या त्वचेच्या समस्यांचा त्रास होऊ लागतो. याशिवाय पावसाळ्यात बहुतांश लोकांना केस गळणे, कोंडा, डोक्यात फोड येण्याची तक्रार सुरू होते. अशावेळी पावसाळ्यात त्वचा आणि केसांशी संबंधित कोणत्या मोठ्या समस्यांचा त्रास होतो आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

फंगल इन्फेक्शन

पावसाच्या पाण्यात बराच वेळ ओल्या कपड्यात राहिल्याने, बराच वेळ ओले शूज घातल्याने किंवा जास्त घाम आल्याने व्यक्तीला एथलिट फूट आणि खाज सुटणे यासारख्या फंगल इंफेक्शनची समस्या उद्भवू लागते. हे टाळण्यासाठी आपले पाय शक्य तितके कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. फंगल इंफेक्शन झाल्यास अँटी फंगल फूट पावडर वापरा.

ट्रेंडिंग न्यूज

एक्ने आणि ब्लॅकहेड्स

पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे त्वचा तेलकट होते. ज्यामुळे त्वचेवर बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात. त्यामुळे त्वचेवर पुरळ, एक्ने आणि ब्लॅकहेड्सची समस्या वाढू लागते. हे टाळण्यासाठी आपण चांगले सॅलिसिलिक अॅसिड फेस वॉश वापरू शकता.

एक्झिमा

पावसात लोकांना अनेकदा खाज सुटणे किंवा एक्झिमाची समस्या उद्भवते. एक्झामा हा त्वचेचा आजार आहे ज्यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागात खाज येते. खाज सुटण्यामुळे कधीकधी त्वचेत कोरडेपणा आणि पुरळ येऊ शकते. या समस्येवर मात करण्यासाठी त्वचेला चांगले मॉइश्चराइझ ठेवा. यासाठी हलके वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर निवडा.

हायपरपिग्मेंटेशन

पावसाळ्यात हायपरपिग्मेंटेशनची समस्याही सतावू लागते. हे त्वचेत अतिरिक्त मेलेनिन तयार करून होते. हायपरपिग्मेंटेशन, स्किन पॅच या समस्येमुळे त्वचेच्या टी-पॉईंट एरियाचा रंग उर्वरित त्वचेपेक्षा गडद होतो. ही समस्या टाळण्यासाठी पावसाळ्यात सुद्धा सनस्क्रीनचा वापर करायला विसरू नका.

केसांच्या समस्या

पावसाळा केसांच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतो. पावसाळ्यात हवेत असलेल्या अतिरिक्त ओलाव्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळतात. तर घाम, ओलावा आणि घाण केसांच्या मुळांमध्ये आणि टाळूमध्ये जमा होते. ज्यामुळे टाळूमध्ये संसर्ग आणि रोगाचा धोका वाढतो.

या टिप्स आहेत उपयुक्त

- पावसाच्या पाण्यात जास्त वेळ भिजणे टाळा. पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर घरी जाऊन आंघोळ करावी. असे केल्याने शरीरावरील घाम, घाण आणि बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात साफ होतात.

- हात-पायाच्या बोटांमध्ये फंगल इंफेक्शन, पायात एथलीट फूट अशा काही समस्या असल्यास बाधित भाग स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्यावी. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित वेळी वापरा.

- चेहरा आणि मानेची त्वचा नियमितपणे एक्सफोलिएट आणि मॉइश्चरायझ करा. असे केल्याने मृत त्वचा आणि घाण साफ होते.

- पावसात सैल आणि सुती कपडे घाला.

- केसांना चांगले शॅम्पू आणि कंडिशनर केल्यानंतर ते चांगले वाळवल्यानंतरच बांधा. ओले केस बांधल्याने केसांची मुळे अधिक कमकुवत होतात आणि ते लवकर तुटू लागतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel