Tips to Use Neem Leaves for Skin and Hair Problem in Monsoon: पावसाळ्यात बॅक्टेरियाची वाढ झपाट्याने होते. ज्याचा परिणाम शरीरावरही होतो. विशेषत: ज्यांची त्वचा सेंसेटिव्ह असते, त्यांना चेहऱ्यावर एक्ने, पिंपल्स तसेच शरीरावर पुरळ उठतात. याशिवाय पावसाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा वेळी कडुनिंबाची पाने हा एक प्रभावी उपाय आहे. रोज कडुनिंबाच्या पानांचा वापर केल्यास पावसाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या टाळता येतात. कडुनिंबाची पाने कशी वापरायची ते जाणून घ्या.
- दररोज आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाच्या पानांचा वापर केला तर हे शरीराला बॅक्टेरिया फ्री ठेवते. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून आंघोळीच्या पाण्यात टाका.
- पावसामुळे शरीराला खाज येत असेल तर खाज येत असलेल्या ठिकाणी कडुनिंबाच्या पानांची पेस्ट लावा. वारंवार खाज सुटण्यापासून आराम मिळेल.
- टाळूला खाज येत असेल किंवा वास येत असेल तर कडुनिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून डोक्यावर लावा. हे अर्धा तास राहू द्या. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- कोंडा जास्त असल्यास कडुनिंबाची पाने एक लिटर पाण्यात उकळून घ्यावीत. हे पाणी पूर्णपणे हिरवे झाल्यावर ते गाळून थंड करावे. केसांना शॅम्पू केल्यानंतर शेवटी या पाण्याने डोकं धुवावे.
- चेहऱ्यावर पिंपल्स दिसत असतील तर कडुनिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून कोरफड जेलमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा.
- पुरळ, फोड झाले असतील तर कडुनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये हळद मिक्स करून लावा. याने त्वचा स्वच्छ राहते आणि छोटे फोड, पुरळ दूर होतात.
- रोज सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची ताजी, हिरवी, लहान दोन ते तीन पाने चावून खाल्ल्याने विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
- कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून फक्त १० मिली पाणी प्यायल्यास याचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)