Tips to Keep Kids Healthy During Monsoon: पावसाळा येताच मुलांच्या मस्तीने पालकांचे टेन्शनही वाढते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे लहान मुले या ऋतूत आजारी पडतात. पावसाळा हा असा काळ असतो जेव्हा सर्वत्र पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ लागते. ज्यामुळे आजूबाजूला अनेक प्रकारचे इन्फेक्शन आणि डेंग्यू मलेरिया ताप येण्याचा धोका असतो. अशावेळी जर तुमचे मूलही मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडत असेल तर आता काळजी करू नका. या टिप्स त्यांना पावसाळ्यात आजारी पडण्यापासून वाचवतील.
मुलांना विनाकारण घराबाहेर पडू देऊ नका. पावसाळ्यात रस्त्यावर सर्वत्र घाण असते. ज्यामुळे मुलांना संसर्ग होऊन आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत मुलांना फार बाहेर जाऊ देऊ नका.
पावसाळ्यात मुले आजारी पडू नयेत म्हणून त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. या ऋतूत मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थ, नट्स, हिरव्या भाज्यांचा समावेश करा. स्ट्रीट फूड, जंक फूड, थंड पदार्थ टाळा.
मुले अनेकदा पावसात भिजण्याचा आग्रह धरतात. परंतु त्यांना जास्त वेळ पाण्यात भिजण्यापासून वाचवा. पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर किंवा मातीत खेळल्यानंतर मुलांना लगेच आंघोळ घालावी. अशा हवामानात मुलाला धुळीचे कपडे घालू देऊ नका. लक्षात ठेवा, या ऋतूत स्वच्छतेची काळजी घेतल्यास आजारांचा धोका कमी होतो.
पावसाळ्यात मुलांना कोरडे, हलके उबदार कपडे घालावेत. असे केल्याने कपड्यांचा ओलावा दूर होईल. याशिवाय लहान बाळांच्या सुरक्षिततेबद्दल बोलायचे झाले तर या ऋतूत बाळाची नॅपी वारंवार तपासून त्याचा ओला डायपर बदलावा. जर आपण असे केले नाही तर बाळाला पुरळ किंवा संसर्ग होऊ शकतो.
पावसाळ्यात नळांमध्ये अनेकदा घाणेरडे पाणी येते. पण आपल्या मुलाने नेहमी स्वच्छ पाणी प्यावे याची काळजी घ्यावी. यासाठी पाणी उकळून थंड करून बाळाला प्यायला द्यावे. घाणेरडे पाणी प्यायल्याने मुलाचे पोट खराब होते आणि उलट्या आणि अतिसार देखील होऊ शकतो.
पावसाळ्यात रस्ते व खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने तेथे डासांची उत्पत्ती होऊ लागते. ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी पावसाळ्यात डासांपासून वाचण्यासाठी मुलाला मच्छरदाणीत झोपवावे. संध्याकाळी फूल स्लिव्ज कपडे घालून ठेवावे. बागेत खेळायला जाण्यापूर्वी मुलाच्या टी-शर्टवर आणि शरीराच्या मोकळ्या भागावर मॉस्किटो क्रीम लावा, जेणेकरून क्रीमच्या वासाने डास मुलांच्या जवळ येणार नाहीत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)