Mpox : मंकीपॉक्स आजाराचं जगभरात थैमान; जाणून घ्या या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार-monkeypox disease do you know the causes symptoms and remedies of this disease ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mpox : मंकीपॉक्स आजाराचं जगभरात थैमान; जाणून घ्या या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार

Mpox : मंकीपॉक्स आजाराचं जगभरात थैमान; जाणून घ्या या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार

Aug 15, 2024 02:07 PM IST

Monkeypox Disease Causes Symptoms and Remedies: सध्या जागतिक पातळीवर मंकीपॉक्स या व्हायरसने थैमान घातला आहे.

Mpox Disease
Mpox Disease (pexbay)

Monkeypox Disease Causes Symptoms and Remedies: सध्या जागतिक पातळीवर मंकीपॉक्स या व्हायरसने थैमान घातला आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि इतर आफ्रिकन देशांमध्ये या आजाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे, 'जागतिक आरोग्य संघटना' (WHO) ने आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून मंकीपॉक्सला (mpox) सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. या आजाराबाबत अद्याप अनेक लोकांना माहितीच नाही. त्यामुळेच आज आम्ही या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार याची माहिती सांगणार आहोत.

मंकीपॉक्स म्हणजे नेमकं काय?

तज्ञांच्या मते, मंकीपॉक्स ऑर्थोपॉक्सव्हायरस कुटुंबातील आहे. हा एक झुनोसिस रोग आहे. जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. ज्यामुळे शरीरावर बारीक दाणे आल्यासारखे दिसतात. यामध्ये व्हेरिओला विषाणूचाही समावेश आहे. या विषाणूमुळे स्मॉल पॉक्स होतो. मंकीपॉक्स पहिल्यांदा १९५८ मध्ये प्राण्यांमध्ये दिसून आला. त्यावेळी माकडांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग आढळून आला होता. तर काहीच वर्षांनी म्हणजेच १९७० मध्ये, कांगोमधील एका मुलामध्ये मंकीपॉक्स आढळून आला. माणसांमध्ये हा आजार आढळण्याची ही पहिलीच वेळ होती. तर, १९८० मध्ये चेचक निर्मूलनानंतर, ही एक गंभीर समस्या म्हणून उदयास आली आहे. जास्तकरून उष्णकटिबंधीय वर्षावनांच्या जवळ ही प्रकरणे आढळतात. उंदीर, डॉर्माईस, माकडांच्या विविध प्रजाती आणि इतर प्राणीदेखील या विषाणूचे मुख्य वाहक आहेत.या रोगाबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.

मंकीपॉक्सची लक्षणे-

-ताप

-डोकेदुखी

- स्नायू दुखणे

- शरीरावर भरीव पुरळ उठणे

- घसा खवखवणे

-वारंवार खोकला

- सुस्त वाटणे

- खाज सुटण्याची समस्या

-लिम्फ नोड्स सुजणे

- थंडी जाणवणे

-पाठ सतत दुखणे

-त्वचा तडतडून भेगा पडणे

मंकीपॉक्सचे कारण-

सीडीसीच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव एखाद्या प्राण्याच्या किंवा मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील संक्रमित द्रवपदार्थाच्या संपर्कामुळे, संक्रमित प्राण्याचा चावा, स्पर्श इत्यादीमुळे होतो. विशेषतः, उंदीर, खार आणि माकडांद्वारे त्याचा प्रसार अधिक होतो. दुसरीकडे मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूला ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यास मंकीपॉक्सचा धोका असतो. याशिवाय मंकीपॉक्स हा आजार आधीच या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्याने देखील होऊ शकतो.

मंकीपॉक्सवर उपचार-

एमपॉक्स (मंकीपॉक्स) रुग्णांवर उपचार हा त्याच्या लक्षणांवर अवलंबून असतो. एमपॉक्सविरुद्ध प्रभावी ठरू शकतील अशा विविध उपचार पद्धती विकसित करून त्या तपासल्या जात आहेत. यासाठी मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीने चेचकचे टीकाकरण करणे आवश्यक आहे. शिवाय सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहणे सोयीचे ठरेल.

विभाग